राहुल द्रविड नंतर कसोटी क्रिकेटमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या चेतेश्वर पुजाराने भारतीय संघाला आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने अनेक सामने जिंकवून दिले आहेत. अनेकांनी त्याला भारतीय कसोटी संघाची ‘नवी द वॉल’ देखील म्हटले आहे. भारताला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकून देण्यात पुजाराने महत्वाची भूमिका बजावली होती. परंतु इंग्लंड संघाविरुद्ध चालू असलेल्या मालिकेत चांगली कामगिरी करण्यात त्याला अपयश आले आहे. अशातच भारतीय संघाच्या निवड समितीच्या माजी सदस्याने पुजाराच्या फलंदाजीमधील कमतरतेबद्दल वक्तव्य केले आहे.
रणजी ट्रॉफी २०१९ मध्ये अंतिम सामन्यात सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करत असताना पुजारा हा डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज आदित्य सरवटे विरुद्ध खेळताना अडचणीत येत होता. त्या सामन्यात सरवटेने पुजारला दोन्ही डावात बाद केले होते. तसेच इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील ५ डावात तो ३ वेळेस डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज जॅक लिचच्या हातून बाद झाला आहे.
अशातच भारतीय संघाच्या निवड समितीचे माजी सदस्य आणि माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांनी म्हटले की, “पुजारा सध्या डावखुऱ्या फिरकीपटूंच्या गोलंदाजी विरोधात आपल्या पायांचा उपयोग करत आहे. सर्व काही ठीक आहे. परंतु जेव्हा तो अडचणींमध्ये असतो तेव्हा तो डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध पूर्णपणे पायांचा वापर नाही करत. इथेच तो फसतो आहे आणि स्लीपमध्ये झेलबाद होत आहे.”
रणजी ट्रॉफी २०१९ मध्ये विदर्भ संघाच्या गोलंदाजांनी देखील योग्य रणनीती आखून पूजाराला बाद केले होते. विदर्भ संघाचा कर्णधार फैज फजलने म्हटले की, “आम्हाला चांगलच माहिती आहे की पुजाराचा फूटवर्क खूप चांगला आहे. त्याला क्रीजमध्ये खेळायला आवडत नाही. त्यामुळे आम्ही विचार केला होता की, त्याला एक धाव घेण्यापासून आणि स्ट्राईक रोटेट करण्यापासून थांबवावे लागेल. आम्ही त्याच अनुषंगाने क्षेत्ररक्षणाची योजना केली होती आणि गोलंदाजांनी देखील रणनितीनुसार गोलंदाजी केली. यामुळे त्याला एक-दोन धावा घेण्यापासून थांबवण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यांनतर सरकटेने त्याला बाद केले.”
महत्त्वाच्या बातम्या-
Video: जड्डू इज बॅक! भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, वनडे मालिकेपूर्वी मैदानावर परतला जडेजा
‘त्या’ निर्णयामुळे ऑस्ट्रेलियाचं कसोटी चॅम्पियनशीपचं स्वप्न चक्काचूर; भारताला मिळालं फायनलचं तिकीट?
मानलं तुम्हाला भावांनो! टी२० मालिकेसाठी ‘या’ भारतीय खेळाडूंनी कारने केला ६७८ किमीचा प्रवास





