---Advertisement---

काय सांगता! सराव सत्रात ‘या’ प्रमुख भारतीय फलंदाजाच्या हाताला जोरदार चेंडू लागला अन्…

On: रविवार, जानेवारी 3, 2021 9:39 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे गेल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात अविस्मरणीय विजय मिळवला. मेलबर्न येथे झालेल्या या सामन्यात भारताने सांघिक कामगिरी करत ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्सने मात केली. त्यानंतर ७ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीला दोन्ही संघ लागले आहेत. अशात शनिवारी (२ जानेवारी) फलंदाजीचा सराव करत असताना भारतीय संघावर मोठे संकट येता-येता टळले.

झाले असे की, सराव सत्रात भारतीय संघाचा ‘कसोटी स्पेशलिस्ट’ चेतेश्वर पुजारा फलंदाजीचा सराव करत होता. दरम्यान एक वेगवान चेंडू त्याच्या हाताच्या कोपऱ्याला लागला. चेंडू लागताच पुजारा वेदनेने कळवळू लागला आणि तो नेट्सच्या बाहेर निघून गेला. हे दृश्य भारतीय संघासाठी कोणत्या धक्क्यापेक्षा कमी नव्हते. कारण कसोटी मालिकेतील २ सामन्यात भारताने मोहम्मद शमी आणि उमेश यादव या क्रिकेटपटूंना दुखापतीमुळे गमावले आहे.

अशात पुजाराही दुखातीमुळे मालिकेतून बाहेर झाला; तर भारतीय संघाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले असते. परंतु सुदैवाने थोड्या वेळाने पुजारा पुन्हा नेट्समध्ये सराव करण्यासाठी आला. त्यानंतर त्याने बराच वेळ नेट्समध्ये सराव करण्यात घालवला. याचा अर्थ असा होतो की, पुजाराला गंभीर दुखापत झालेली नाही.

पुजाराला सरावाची आवश्यकता

कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या बचावात्मक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा पुजारा यंदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विशेष कामगिरी करू शकला नाही. आतापर्यंत झालेल्या दोन कसोटी सामन्यात त्याला साधे अर्धशतकही लगावता आले नाही. पुजारा भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज आहे आणि संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने संघासाठी मोठ्या आकडी धावा करणे गरजेचे आहे. आतापर्यंत पुजाराने २ कसोटी सामन्यात १५.७५च्या सरासरीने केवळ ६३ धावा केल्या आहेत. त्यामुळे मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यात संघासाठी महत्त्वपुर्ण योगदान देण्याच्या दृष्टीने त्याला कसून सराव करावा लागणार आहे.

सिडनी कसोटीत धावा करण्याची संधी

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात लवकरच होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात धावा करण्याची पुजाराकडे संधी आहे. कारण हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. या मैदानावर अधिकतर भारतीय फलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले आहे. अशात पुजाराने मोठ्या आकडी धावा करत संघाला मालिकेत आघाडी मिळवून द्यावी, अशा सर्वांना त्याच्याकडून अपेक्षा असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ कारणामुळे चालत नाहीये स्टीव्ह स्मिथची बॅट, लॅब्यूशानेने केला खुलासा

…अन् २८ वर्षांपूर्वी ‘या’ भारतीयाच्या विकेटने शेन वॉर्न पर्वाची सुरुवात झाली

‘तो’ क्रिकेटपटू भारतीय गोलंदाजांचा कर्णधार, माजी दिग्गज क्रिकेटपटूचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---