---Advertisement---

धक्कादायक! ‘हा’ भारतीय खेळाडू झाला होता वर्णद्वेषाचा शिकार, दोन वर्षांनी मोठा खुलासा

On: शनिवार, डिसेंबर 5, 2020 6:25 PM
---Advertisement---

इंग्लिश काऊंटी क्रिकेटमधील प्रसिद्ध संघ असलेल्या यॉर्कशायरवरील दुष्टचक्र संपण्याचे नाव घेईना. यॉर्कशायर संघावर वारंवार वर्णद्वेषाचे आरोप होत आहेत. यॉर्कशायरच्या माजी कर्मचार्‍यांनीही क्रिकेटपटू अझीम रफिकच्या वर्णद्वेषी दाव्यांचे समर्थन केले आहे. त्यामुळे संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. भारताच्या कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजाराला देखील आशियाई आणि वेगळ्या रंगाचा असल्यामुळे ‘स्टीव’ असे म्हटले जायचे, असा गौप्यस्फोट या माजी कर्मचार्‍यांनी केला आहे.

माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी केले होते रफिकचे समर्थन

यॉर्कशायरचा माजी क्रिकेटपटू अझीम रफिकने संघ व्यवस्थापनावर वर्णद्वेषाचे आरोप लावले होते. त्यानंतर, वेस्ट इंडिजचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू टीनो बेस्ट आणि पाकिस्तानचा राणा नावेद उल हसन यांनी रफिकच्या आरोपाचे समर्थन करणारे पुरावे सादर केले आहेत. त्यांच्या आरोपाची चौकशी सुरू आहे.

माजी कर्मचाऱ्यांनी दिले पुरावे

क्रिकइंफोने दिलेल्या माहितीनुसार, यॉर्कशायरचे दोन माजी कर्मचारी ताज बट्ट आणि टोनी ब्यूरी यांनी क्लबमधील वर्णद्वेषाविरूद्ध पुरावे दिले आहेत. यॉर्कशायर क्रिकेट फाऊंडेशनमध्ये सामुदायिक विकास अधिकारी म्हणून काम केलेले बट्ट म्हणाले की, “आशियाई समुदायाचा संदर्भ घेताना टॅक्सी चालक आणि रेस्टॉरंटमधील कामगारांचा संघात वारंवार उल्लेख होत असे. आशियाई वंशाच्या प्रत्येकाला तिथे ‘स्टीव’ म्हटले जायचे. भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारालाही ‘स्टीव’ म्हटले गेले होते. कारण, त्याचे नाव त्यांना उच्चारता येत नव्हते.”

बट यांनी या नोकरीचा सहा महिन्यांत राजीनामा दिला होता. दुसरे कर्मचारी ब्यूरी हे १९९६ ते २०११ या काळात यॉर्कशायर क्रिकेट बोर्डामध्ये सांस्कृतिक विविधता अधिकारी होते. नंतर त्यांना क्रिकेट डेव्हलपमेंट मॅनेजर बनवण्यात आले होते. ब्यूरी यांनी वर्णद्वेषाच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “बर्‍याच तरुण खेळाडूंना ड्रेसिंग रूमच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात अडचण येत होती. कारण, त्यांच्यावर वर्णद्वेषाच्या टिप्पण्या केल्या जायच्या. ज्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर झाला आणि त्यानंतर त्याच खेळाडूंवर खराब कामगिरीचा ठपका ठेवण्यात आला.”

रफिकने आणले होते प्रकरण समोर

दोन वर्षांपूर्वी यॉर्कशायर काऊंटी क्लब सोडलेल्या अझीम रफिकने हे सर्व प्रकरण मागील महिन्यात समोर आणले होते. त्याने असेही म्हटले होते की, या कटू अनुभवाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा विचारही केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व न करणारा युवा खेळाडू आहे वॉर्नरचा फेव्हरेट

“झहीरने गांगुलीच्या नेतृत्वात जशी कामगिरी केली, तशीच टी नटराजन विराटच्या नेतृत्वात करू शकतो”

मोठी बातमी! कोरे अँडरसनची न्यूझीलंड क्रिकेटमधून निवृत्ती; आता ‘या’ देशात खेळणार क्रिकेट

ट्रेंडिंग लेख-

अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण

HBD गब्बर : चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी

मराठीत माहिती- क्रिकेटर शिखर धवन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---