मुंबई। चेतेश्वर पुजारा हा भारताचा प्रसिद्ध क्रिकेटर. सध्या तो आहे इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमधल्या एका खास ठिकाणी तो कुटुंबासह धमाल करताना दिसला. पुजारा इंग्लंडमध्ये ससेक्ससाठी काउंटी क्रिकेट खेळतो आहे. यादरम्यान इंग्लंडच्या बर्कशायरच्या लेगोलॅंड थीम पार्कमध्ये पत्नी आणि मुलीसह चेतेश्वर पुजारा मंगळवारी (दि. २६ एप्रिल) धमाल करताना दिसला. याची माहिती त्याने स्वत: स्वदेशी सोशल मीडिया मंच, ‘कू’ ऍपच्या माध्यमातून दिली आहे.
मंगळवारी चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) पत्नी पूजा आणि मुलगी अदितीसह अनेक सुंदर फोटो शेअर केले आणि लिहिले, “लेगोलँडमध्ये कुटुंबासह एक मस्त दिवस घालवला.”
भारतीय कसोटी संघाची भिंत म्हणवला जाणारा चेतेश्वर पुजारा दीर्घकाळापासून स्वत:च्या खराब फॉर्मशी झगडत होता. आता त्याला त्याचा फॉर्म परत मिळाला आहे. याकाळात काउंटी क्रिकेटमध्ये पुजारा धुंवाधार धावा करतो आहे. त्याच्या कामगिरीने चाहत्यांच्या ओठावर पुन्हा एकदा हास्य आणले आहे. अशाप्रकारे चेतेश्वर पुजाराने भारतीय संघामध्ये पुनरागमनाचा दरवाजा पुन्हा एकदा ठोठावला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय संघामधून बाहेर पडावे लागल्यानंतर पुजारा आयपीएल २०२२च्या मेगा लिलावामध्येही अनसोल्ड राहिला. मात्र, आपल्याला मिळालेला मोकळा वेळ नीट वापरत पुजाराने काउंटी क्रिकेटकडे मोर्चा वळवला. काउंटी क्रिकेटमध्ये नुकतेच सलग दोन शतक करत पुजाराने टीम इंडियामध्ये पुनरागमनाचा रस्ता प्रशस्त केला आहे. वॉस्टरशायरविरुद्ध चेतेश्वर पुजाराने आपल्या फर्स्टक्लास करियरचे ५२वे शतक झळकावले.
यशासाठीच्या या मोसमात त्यांने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दोन उत्कृष्ट खेळी खेळत दीर्घकाळापासून मोठी खेळी न खेळण्याचा दुष्काळ संपवला. पहिल्या सामन्यात डर्बीशायरविरुद्ध त्याने दुहेरी शतक करत आपल्या टीमसाठी सामना राखून ठेवण्यात मोठी भूमिका निभावली. सोबतच दुसऱ्या सामन्यातही त्याने शतक लगावले. मात्र, यावेळी त्यांच्या संघाला वोस्टरशायरविरुद्ध मोठाच पराभव पत्करावा लागला.
पुजाराने विजयाच्या पहिल्या खेळीत सतत पडणाऱ्या विकेट्सच्या दरम्यान २०६ चेंडूंचा सामना करताना १६ चौकारांच्या मदतीने १०९ धावा केल्या. या खेळीव्यतिरिक्त त्यांचा संघ केवळ २६९ धावाच करू शकली. याप्रकारे वोस्टरशायरच्या पहिल्या खेळीत ४९१ धावांच्या आधारे टीमला फॉलोऑन खेळावा लागला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
समालोचन सोडून इंग्लंडचे प्रशिक्षक बनणार का रवी शास्त्री? म्हणाले, ‘आता हा रस्ता ओलांडून…’
‘तीन-चार फ्रँचायझी खोटे बोलल्या, त्यांनी धोका दिला’, हर्षल पटेलचा मोठा खुलासा