---Advertisement---

‘हा’ पदार्थ पाहताच ‘फिटनेस किंग’ कोहलीच्या तोंडाला सुटतं पाणी, आवडत्या डिशचं नाव माहितंय का?

On: मंगळवार, सप्टेंबर 14, 2021 11:11 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानावर जितका आक्रमक आहे, तितकाच तो मैदानाबाहेर विनोदी देखील आहे. कर्णधार विराट कोहलीने गेल्या काही काळात अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. अनेक पुरस्कार देखील त्याने त्याच्या नावावर केले आहेत. सध्या तो आयपीएल २०२१ चा उर्वरीत भाग आणि टी-२० विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहे. तसे तर, विराट कोहलीच्या मैदानी विक्रमांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडींमध्येही चाहत्यांना फार रस असतो.

काही महिन्यांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एका ‘टॉक शो’ मध्ये पोहोचला होता. या कार्यक्रमादरम्यान त्यावने बरेचसे खुलासे केले होते.

त्याने सांगितले होते की, माजी भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराची मुलाखत पाहिल्यानंतर त्याने या कार्यक्रमात येण्याचा निर्णय घेतला होता. चाहत्यांच्या वाढत्या मागणीमुळे आयोजनकांना कोहलीला या कार्यक्रमात बोलवायचे होते. जेव्हा कोहली या कार्यक्रमात आला, तेव्हा चाहत्यांनाही आनंद झाला होता.

या कार्यक्रमात विराट कोहली एका वेगळ्याच रंगात दिसला होता. मुलाखतीदरम्यान कोहलीने आपल्या सर्व सहकारी आणि खेळाडूंबद्दल अनेक मनोरंजक गोष्टी उघड केल्या. तो म्हणाला की, ‘रोहित शर्मा हा संघातील सर्वात जास्त विसरभोळा व्यक्ती आहे. तो अनेकदा त्याच्या गोष्टी विसरतो. अगदी पासपोर्ट देखील तो बऱ्याचदा विसरला आहे.’

‘फिटनेस किंग’ विराट कोहलीने मुलाखतीदरम्यान असाही खुलासा केला होता की, त्याने चार वर्षांपासून ‘बटर चिकन’ आणि ‘नान’ला स्पर्श देखील केलेला नाही. यासोबतच कोहलीने सांगितले की, त्याचे आवडते खाद्यपदार्थ ‘छोले-भटुरे’ आहेत. त्याला दिल्लीचे राजौरी गार्डन येथील प्रसिद्ध ‘राम के छोले-भटुरे’ आवडतात. पण त्याला ते घरी पॅकिंग करून आणून खायला आवडत नाही. त्याला संधी मिळाली तर छोले-भटूरे दुकानात जाऊन खायला आवडते.

याशिवाय नातेसंबंध कसे जपावे आणि वाढवावे, हे तो जहिर खानकडून शिकला आहे. तसेच सर्वोत्तम नातेसंबंध कोणापासूनही लपवू नयेत हेही तो जहिरकडून शिकला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीनंतर ‘या’ शिलेदाराला बनायचं आहे सीएसकेचा उत्तराधिकारी! इशाऱ्यांमध्ये सांगितली मनातील गोष्ट

वीरूने केली रहाणेची पाठराखण, म्हणाला “…तरच त्याला संघाबाहेर करा”

घटस्फोटानंतर धवनची व्हिडिओ कॉलद्वारे मुलासोबत दंगामस्ती, पाहा बाप-लेकातील प्रेमळ क्षण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---