---Advertisement---

अनुष्का शर्मानंतर आता एमएसके प्रसादही फारुख इंजिनियर यांच्यावर भडकले, म्हणाले…

---Advertisement---

भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज फारुख इंजिनियर यांनी एका मुलाखतीत भारतीय संघाचे निवडकर्ते विश्वचषकादरम्यान विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला चहा नेऊन देत होते असे म्हणत निवड समीतीवर टीका केली होती.

या टीकेनंतर भारतीय निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटले आहे की 82 वर्षीय व्यक्तीकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती.

प्रसाद म्हणाले, ‘मला त्यांच्याबद्दल वाईट वाटते जे क्षुल्लक चर्चेतून आनंद घेतात. ते खोट्या आणि फालतू आरोपांच्या माध्यमातून निवडकर्त्यांचा आणि भारतीय कर्णधाराच्या पत्नीचा अपमान आणि अनादर करत आहेत.’

तसेच प्रसाद म्हणाले, ‘या निवड समीतीची नियुक्ती बीसीसीआच्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीत योग्य प्रक्रियेनुसारच करण्यात आली आहे, हे विसरु नका.’

‘वयाच्या 82 व्या वर्षी एखाद्याने परिपक्वता दाखवायला पाहिजे आणि त्यांच्या काळापासून आत्तापर्यंत भारतीय क्रिकेटमध्ये झालेल्या प्रगतीचा आनंद घ्यायला हवा.’

अनुष्कानेही दिले सडेतोड उत्तर- 

इंजिनियर यांच्या वक्तव्याबद्दल अनुष्का शर्मानेही  सोशल मीडियावर एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले. यामध्ये तिने ‘जर तूम्हाला निवड समीतीवर टीका करायची असेल तर जरूर करा पण त्यामध्ये माझे नाव आणू नका.’ असे म्हणत तिची तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---