7 जुलैला भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने 37 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्याला भरभरुन शुभेच्छा दिल्या.
यात ज्यूनियर एमएसडी अशी ओळख मिळवणाऱ्या चेन्नईच्या तीन वर्षांच्या सानुश सूर्यदेवनेही धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे सानुशचाही वाढदिवस 7 जुलैला असतो. त्यानेही शनिवारी त्याचा तिसरा वाढदिवस साजरा केला.
सानुश याचे नाव एशिया बुक आॅफ रेकॉर्ड आणि इंडीया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये सर्वात कमी वयाचा व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून नाव नोंदवले गेले आहे. तो क्रिकेटमध्ये स्ट्रेट ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह आणि क्रिकेटचे अनेक फटके चांगल्या रितीने मारु शकतो.
तसेच या वर्षाच्या सुरुवातीला धोनीही सानुशला भेटला होता. सानुश हा डाव्या हाताने फलंदाजी करतो तर गोलंदाजीही डाव्या हाताने करतो. तसेच त्याने क्रिकेट खेळायला 1 वर्षांचा असल्यापासून सुरवात केली आहे.
7-7-15 #SanushSuryadev #born pic.twitter.com/LJaXJi949x
— Junior MSD (@SanushSuryadev) July 6, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
-एशियन गेम्ससाठी भारतीय महिला आणि पुरुष कबड्डी संघाची घोषणा
-२०१० साली झालेल्या आयपीएल स्पर्धेतील मोठ्या घटनेचा खुलासा
-काय सांगता! धोनीवर पुन्हा चित्रपट बनणार?