नवी दिल्ली । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, आफ्रिदी गांभीर्याने घेण्यासारखा व्यक्ती नाही. भारतीय क्रिकेट संघातील कोणीही त्याला गांभीर्याने घेत नाही.
इतकेच नव्हे तर तो जेव्हा खेळत होता, तेव्हाही त्याच्याकडे कोणी लक्ष देत नव्हते. राजकुमार (Rajkumar Sharma) पुढे म्हणाले की, तो त्यासाठी लायकदेखील नाही. कारण, अशा गोष्टी कोणत्याही स्तरावर स्विकारल्या जाणार नाहीत.
रिपब्लीक टी.व्ही.बरोबर बोलताना राजकुमार म्हणाले की, “आफ्रिदी एक नकारात्मक व्यक्ती आहे.” तसेच त्यांनी पुढे बोलताना खुलासा केला की, “विराटदेखील (Virat Kohli) आफ्रिदीबद्दल कधीच चर्चा करत नाही. तो त्याला इतके महत्त्वाचा वाटत नाही की त्याच्याशी चर्चा केली पाहिजे.”
आफ्रिदीला राजकारणात यायचंय-
“४० वर्षीय खेळाडू आफ्रिदीने (Shahid Afridi) कसे वागावे हे शिकले पाहिजे. मला असे वाटते की, आफ्रिदी राजकारणी बनण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे भारताविरुद्ध अशा शब्दांंचा वापर करत पाकिस्तानमध्ये नेता म्हणून प्रसिद्ध होऊ पाहतोय. त्याने आपल्या देशासाठी उभे राहिले पाहिजे. परंतु कधीच कोणत्या देशाबद्दल आणि त्यांच्या पंतप्रधानाविषयी अशा चूकीच्या शब्दांचा वापर केला नाही पाहिजे,” असे राजकुमार पुढे म्हणाले.
“यापूर्वीही कोणीही आफ्रिदीला गांभीर्याने (Seriously) घेत नव्हते आणि आता तर अजिबात घेणार नाहीत,” असेही राजकुमार यावेळी म्हणाले.
यापूर्वीही आफ्रिदीला मिळाले आहे प्रत्युत्तर-
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध (PM Narendra Modi) विवादात्मक वक्तव्य केल्यामुळे आफ्रिदीला प्रशिक्षक राजकुमार यांच्याव्यितिरिक्त अनेक भारतीयांनी फटकारले आहे. यामध्ये गौतम गंभीर, हरभजन सिंग, युवराज सिंग, सुरेश रैना, शिखर धवन, जावेद अख्तर यांचा समावेश आहे.
खरंतर आफ्रिदीने पंतप्रधान मोदींविरुद्ध म्हटले होते की, “कोरोना व्हायरसपेक्षा (Corona Virus) मोठा आजार मोदींच्या हृदयात आणि डोक्यात आहे. तसेच तो आजार म्हणजे धर्माचा आजार आहे. त्या आजारासाठी मोदी राजकारण करत आहेत. ते आमच्या काश्मीरच्या भाऊ-बहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांचा छळ करत आहेत. याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-दिनेश कार्तिक होणार होता मुंबई इंडियन्सचा कर्णधार, या खेळाडूने पुढाकार घेतं केले रोहितला…
-अर्जून तेंडूलकरचे केस कापले थेट मास्टर ब्लास्टरने, खास व्हिडीओ पहा
-रोहित म्हणतो, कॅप्टन कूल धोनी नसता तर ही गोष्ट कधीच नसतो करु शकलो