---Advertisement---

तो आला, त्याने मॅच जिंकून दिली; तरीही ड्रेसिंग रूममध्ये का खावा लागला ओरडा?, कुलदीपचा मोठा खुलासा

Kuldeep-Yadav-And-Rohit-Sharma-And-Rahul-Dravid
---Advertisement---

भारतीय संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तुफान फॉर्मात आहे. श्रीलंकेविरुद्ध आधी टी20 आणि आता वनडेतही भारताचे विजय सत्र सुरूच आहे. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दोन सामने भारतीय संघाने आपल्या नावावर केले आहेत. दुसरा वनडे सामना ईडन गार्डन्स, कोलकाता येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याने भल्याभल्या गोलंदाजांना लाजवेल अशी गोलंदाजी केली. त्याने या रोमांचक सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. मात्र, श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी करूनही कुलदीपला ड्रेसिंग रूममध्ये ओरडा बसला. याचा खुलासा स्वत: कुलदीपने केला आहे.

ड्रेसिंग रूममध्ये कुलदीपवर आगपाखड
दुसऱ्या वनडेत विजय मिळाल्यानंतर संघाबाहेर असलेल्या युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्याशी संवाद साधला. यादरम्यान चहलने कुलदीपला त्या फ्री हिट चेंडूविषयी विचारले, ज्यावर मोठा शॉट खेळण्यात कुलदीप अपयशी ठरला. कुलदीप याबद्दल स्पष्टपणे बोलला की, “फ्री हिटवर मी कट मारून क्षेत्ररक्षकाच्या वरून तो चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चेंडू थेट हातात गेला. मला यासाठी ड्रेसिंग रूममध्ये बोलणी बसली. आता मी यावर काम करेल. जेव्हाही संधी मिळेल, तिथे चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. केएल भाई सोबत होता, तेव्हा कोणताही विचित्र शॉट न मारण्याबद्दल विचार करत होतो.”

‘खेळपट्टीवरील फलंदाजी कठीण’
आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचे फलंदाज एकापाठोपाठ एक स्वस्तात बाद होऊन तंबूत जात होते. यानंतर खेळपट्टीवर आलेल्या कुलदीप यादव आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी भारताला विजय मिळवून दिला. मात्र, या खेळपट्टीवर फलंदाजी करणे खूपच कठीण होत होते. याबद्दल कुलदीप म्हणाला की, “जास्त काही विचार केला नव्हता. फिरकीसाठी कोलकाताची खेळपट्टी जास्त चांगली नसते. कारण, चेंडू बॅटवर येतो. मात्र, मी चांगल्या लेंथवर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. विकेट टू विकेट चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. खेळपट्टीच्या मधोमध चेंडू फेकत चेंडूला बाहेर आणि आत आणण्याचा प्रयत्न करत होतो. लयीत राहण्यामुळे गती वाढवली आणि कमीदेखील केली.”

खरं तर, कुलदीप यादव याने सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना 51 धावा खर्च केल्या. तसेच, 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 5.10 इतका होता. यादरम्यान त्याने फलंदाजी करताना नाबाद 10 धावांचे योगदानही दिले. त्याच्या शानदार कामिगरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. (chinaman bowler kuldeep yadav bad shot selection team india dressing room vs sl in 2nd odi)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितने दिली संधी, पण कुलदीपने भलत्याच खेळाडूचे गायले गुणगान; म्हणाला, ‘त्याने मला नेहमीच पाठिंबा दिला’
चक दे इंडिया! विराट ते सचिन, ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूंनी भारतीय हॉकी संघावर पाडला शुभेच्छांचा पाऊस

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---