---Advertisement---

जमाईका टू इंडिया! आयपीएलदरम्यान ख्रिस गेलचे रॅप साँग झाले प्रदर्शित, इंटरनेटवर व्हिडिओ घालतोय धुमाकूळ

On: रविवार, एप्रिल 11, 2021 7:45 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेसाठी पंजाब किंग्ज संघ देखील सज्ज झाला आहे. आयपीएलच्या चौथ्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाचा सामना राजस्थान रॉयल्स संघासमोर रंगणार आहे. या हंगामात देखील ख्रिस गेल चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसणार आहे. तसेच या मोठ्या सामन्यापूर्वी तो मस्ती करताना दिसून आला आहे.

मैदानात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणारा ख्रिस गेल मैदानाबाहेर नेहमीच आपल्या मजेशीर स्वभावामुळे चर्चेत राहिला आहे. आयपीएल स्पर्धेत खेळण्यापूर्वीच त्याची चर्चा सर्वत्र रंगल्याचे पाहायला मिळत आहे. तो एका नवीन रॅप साँगमध्ये झळकताना दिसणार आहे. आज (११ एप्रिल ) त्याचे एक रॅप साँग रिलीज झाले आहे. ज्यामध्ये त्याने एमिवे बंटाई सोबत रॅप साँग गायले आहे.

एमिवे बंटाईने गेलसोबत मिळून “जमाईका टू इंडिया” हे रॅप साँग गायले आहे. अवघ्या काही तासातच हे साँग प्रचंड व्हायरल झाले आहे. हे रॅप साँग हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत गायले गेले आहे. या साँगचे बोल ख्रिस गेल आणि एमिवे बंटाईच्या टीमने लिहिले आहेत. तर या साँगला म्युझिक टोनी जेम्स याने दिले आहे. हे साँग कमी वेळातच प्रचंड झाले असून १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे साँग ऐकलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

देवदत्त पड्डीकलमुळे आयपीएलमधील सर्व संघांचा चढला पारा, पाहा काय आहे नक्की कारण

Video: चेन्नईला पराभूत केल्यानंतरही पंतने जिंकली धोनीच्या चाहत्यांची मने, ‘हे’ आहे कारण

SRHvsKKR Live: टॉस जिंकून हैदराबादचा प्रथम बॉलिंगचा निर्णय; विजयी सलामी देण्यासाठी दोन्ही संघ सज्ज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---