दक्षिण आफ्रिका संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात टी२० मालिकेचा थरार सुरू आहे. गुरुवारी (०१ जुलै) या मालिकेतील चौथा टी२० सामना पार पडला. यजमानांनी २१ धावांनी पाहुण्या संघाला पछाडत मालिकेत २-२ ने बरोबरी साधली आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने कर्णधार कायरन पोलार्डच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १६७ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ १४६ धावाच करू शकला. दरम्यान ख्रिस गेल याने आपल्या फलंदाजीने नव्हे तर एका वेगळ्या कृतीने सामना दर्शकांचे लक्ष वेधले.
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रिझा हेन्ड्रिक्सला पहिल्याच चेंडूवर बाद केल्याने गेलचा आनंद गगनात मावेनासा झाला. यामुळे त्याने आपल्या विकेटचे जोरदार सेलिब्रेशन केले. त्याच्या या अनोख्या सेलिब्रेशननेच सर्वांना आकर्षित केले आहे.
वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने डावातील दुसरेच षटक टाकण्यासाठी विस्फोटक फलंदाज गेलला बोलावले. गेलनेही आपल्या कर्णधाराला निराश न करता पहिल्याच षटकात मोठी विकेट मिळवून दिली. त्याच्या पहिल्याच चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज हेन्ड्रिक्सने साधारण शॉट खेळला. यावर यष्टीरक्षक निकोलस पूरनने हेन्ड्रिक्सची दांडी उडवत गेलला त्याची पहिली विकेट मिळवून दिली.
हे पाहून ‘युनिव्हर्स बॉस’ गेल भलताच आनंदित झाला. त्याने मैदानावर हाताच्या साहाय्याने कार्टविल करत विकेटचा जल्लोष साजरा केला. त्याचे हे सेलिब्रेशन नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
Chris Gayle aged 41 taking wickets and doing cartwheels ???? pic.twitter.com/x0P0A0hyMX
— Caribbean Cricket Podcast (@CaribCricket) July 1, 2021
अगदी अव्वल वेगवान गोलंदाज डेल स्टेन यानेही गेलच्या सेलिब्रेशनचे कौतुक केले आहे. ‘ख्रिस गेल हा सर्वात कूल क्रिकेटपटू’ असल्याचे त्याने म्हटले आहे.
Chris Gayle is the coolest cricketer alive.
— Dale Steyn (@DaleSteyn62) July 1, 2021
दरम्यान गेलच्या या सामन्यातील प्रदर्शनावर नजर टाकायची झाल्यास, तो फलंदाजीत विशेष कामगिरी करू शकला नाही. ८ चेंडूंमध्ये एका चौकाराच्या मदतीने केवळ ५ धावा करत तो झेलबाद झाला. मात्र गोलंदाजी करताना त्याने २ षटकात ११ धावा १ विकेट घेतली. वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटचा टी२० सामना शनिवारी (०३ जुलै) होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिकेवरही आपले नाव कोरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटसेनेची चिंता शिगेला; शुबमनच्या दुखापतीविषयी मोठी माहिती आली पुढे, मालिकेला मुकण्याची शक्यता
पाकिस्तान बोर्डाची मोठी मागणी, चक्क ६ आयसीसी स्पर्धांचे यजमानपद भूषवण्याची दाखवली तयारी
टीम इंडियाला मिळणार नवी सलामी जोडी, मयंक-राहुल नव्हे ‘हा’ कसोटीपटू घेणार शुबमनची जागा?






