इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील 50 वा सामना शुक्रवारी (30 ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झाला. या सामन्यात पंजाबचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने तुफानी फटकेबाजी केली. पण अवघ्या एका धावाने त्याचे शतक हुकले. गेल नेहमीच त्याच्या मजेशीर स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र, या सामन्यात त्याने केलेल्या कृत्यामुळे सामना रेफरीने त्याला आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवलं आहे.
आयपीएल कारकिर्दीतील सातवे शतक हुकले
ख्रिस गेलने राजस्थान विरुद्ध तुफानी डाव खेळला. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणारा गेल आयपीएलमधील सातवे शतक ठोकण्याचा अगदी जवळ पोहोचला होता. पंजाबच्या डावाच्या 19 व्या षटकात राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर गोलंदाजी करायला आला. त्याच्या या षटकाच्या तिसर्या चेंडूवर शानदार षटकार खेचल्यानंतर गेलने 99 धावांवर मजल मारली. गेलला शतक ठोकण्यासाठी फक्त एक धाव घ्यायची होती. पण चौथ्या चेंडूवर आर्चरने त्याला त्रिफळाचीत केले.
गेलने फेकली बॅट
शतक ठोकण्यात अपयश आल्यानंतर गेलने रागाच्या भरात बॅट दूरवर फेकली. मात्र तंबूत जाताना त्याने खेळभावना दाखवली आणि जोफ्रा आर्चर सोबत हात मिळवला.
https://twitter.com/DrDublin1/status/1322250126535151617
आचारसंहितेचं केलं उल्लंघन
बॅट फेकून गेलने आयपीएलच्या आचारसंहिच्या 2.2 मधील लेव्हल 1 चं उल्लंघन केलं आहे. म्हणजेच त्याने खेळभावनेला ठेचं पोहोचवणारं कृत्य केलं आहे. त्यामुळे त्याला सामना शुल्काच्या 10 टक्के दंड थोटावण्यात आला. आचारसंहितेच्या लेव्हल 1 च्या उल्लंघनासाठी, सामना रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.
महत्त्वाच्या बातम्या –
करमणुकीचा बाप! विरूकडून गेलला कौतुकाची थाप; दिली नवी उपाधी
हा फलंदाज टिकला तर विजय पक्का! स्टीव्ह स्मिथने ‘या’ खेळाडूचे केले तोंडभरून कौतुक
ट्रेंडिंग लेख –
सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
…आणि १५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ खेळीने एमएस धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…