नुकताच यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. ही स्पर्धा संपल्यानंतर आता अबू धाबी येथे टी-१० लीग स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत आहे. शनिवारी (२० नोव्हेंबर) लियाम लिविंगस्टनने अवघ्या २३ चेंडूंमध्ये ६८ धावा चोपल्या. तर क्रिकेट चाहत्यांना ख्रिस गेल, फाफ डू प्लेसिस आणि ड्वेन ब्रावो यांचा मजेशीर अंदाज देखील पाहायला मिळाला.
तर झाले असे की, टिम अबू धाबी आणि नॉर्दर्न वॉरियर्स यांच्यातील सामना झाल्यानंतर याच मैदानावर पुढील सामना होणार होता. ड्वेन ब्रावोच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्ली बुल्स आणि फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणारा बांगला टायगर हे संघ आमने सामने येणार होते. दोन्ही कर्णधार नाणेफेक करण्यासाठी तयार होते.
त्यावेळी एक मजेशीर घटना घडली. अबू धाबी संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल नाणेफेक सुरू असताना तिथे पोहोचला होता. सहसा सामनाधिकारी नाणेफेक करत असतात. परंतु ग्रिम स्वानने ख्रिस गेलला नाणेफेक करण्यास सांगितले.
आपल्या मजेशीर स्वभावामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या ख्रिस गेलने नाणे फेकले आणि ख्रिस गेलचा संघ सहकारी आणि जवळचा मित्र ड्वेन ब्रावोने नाणेफेक जिंकले. हे पाहून ख्रिस गेलचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्याने ड्वेन ब्रावोला मीठी मारत आनंद साजरा केला. त्यानंतर फाफ डू प्लेसिसची रिॲक्शन देखील पाहण्यासारखी होती.
https://twitter.com/Sunainagosh7/status/1462095118488330240?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1462095118488330240%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-abu-dhabi-t10-league-chris-gayle-flips-coin-for-dwayne-bravo-and-faf-du-plessis-video-goes-viral-3859779.html
जेव्हा ख्रिस गेलने फाफ डू प्लेसीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फाफ डू प्लेसीसने युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलला बाजूला ढकलले आणि गंमत करत पुन्हा एकदा नाणेफेक करण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर दिल्ली बुल्सने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘देऊन टाक तुझा अवॉर्ड केएल राहुलला’, असं हर्षल पटेलला युजवेंद्र चहल का म्हणाला? पाहा व्हिडिओ
“मला घरी बोलावून असा बर्गर खायला दिला” आर अश्विनचे कौतुक करत वसीम जाफरने शेअर केले मजेशीर मिम
धोनीला चेन्नईत खेळता येणार अखेरचा टी२० सामना? जय शाह यांनी केले मोठे भाष्य