यंदाचा आयपीएल (IPL 2025) हंगाम धुमधडाक्यात सुरू आहे. या हंगामाच्या पहिल्या सामन्यापासून खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे. दरम्यान अनेक रेकाॅर्ड तुटले, तर अनेक नवे रेकाॅर्ड रचले गेले. या हंगामात एकामागून एक रेकाॅर्ड होत आहेत. पण एक असा रेकाॅर्ड आहे जो केवळ मोडणेच नाही तर त्याची बरोबरी करणेही कठीण आहे. हा रेकाॅर्ड युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा (Chris Gayle) आहे, ज्याने 2013 मध्ये 175 धावा केल्या होत्या. आता गेलने स्वतः सांगितले आहे की कोणता फलंदाज तो रेकाॅर्ड मोडू शकतो.
भवानी टायगर्सच्या जर्सी लाँच सोहळ्यात ख्रिस गेलने आयपीएलमधील कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक केले. त्याने अभिषेक शर्मा (Abhishek Sharma), ट्रॅव्हिस हेड (Travis Head) आणि निकोलस पूरन (Nicholas Pooran) यांच्याबद्दल चर्चा केली. त्याने हे देखील सांगितले की कोणता फलंदाज त्याचा 175 धावांचा महान रेकाॅर्ड मोडू शकतो.
गाझियाबादमधील प्रो क्रिकेट लीग कार्यक्रमात गेल म्हणाला, “निकोलस पूरन चांगला फलंदाजी करत आहे. निकोलस पूरन चेंडूला चांगला फटका मारत आहे. कदाचित तो चांगल्या दिवशी 175 ते 180 धावा करू शकेल. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड देखील चांगली कामगिरी करत आहेत. 2 डावखुऱ्या फलंदाजांना वर्चस्व गाजवताना पाहणे खूप छान आहे.”
प्रो क्रिकेट लीग सीझन 2 जूनमध्ये सुरू होईल. गेलने सीझन 2च्या लाँचिंगला हजेरी लावली आणि भवानी टायगर्सच्या जर्सीचे अनावरणही केले. गेल हा या संघाचा दिग्गज खेळाडू आहे. कॉर्पोरेट तरुणांसाठी, प्रो क्रिकेट लीग ही त्यांची स्वप्ने साकार करण्याचे एक साधन आहे. या लीगच्या स्पर्धेत गेलने रोहित आणि विराटबद्दलही चर्चा केली. त्याने स्पष्टपणे सांगितले की सध्या त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या दोन्ही दिग्गजांची विशेष गरज आहे.
ख्रिस गेल म्हणाला की, पूरन त्याच्या रेकाॅर्डची बरोबरी करू शकतो. या हंगामात पूरन उत्तम फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने एकामागून एक विस्फोटक खेळी खेळल्या आहेत. लखनऊकडून, पूरन संघाचा कणा असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या तो या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
आता ख्रिस गेलचा हा कठीण रेकाॅर्ड मोडणे निकोलस पूरनला शक्य होते का? हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरेल. पूरन यंदाच्या आयपीएल हंगामात चांगल्याच फाॅर्मात आहे. त्यामुळे तो त्याच्या बॅटमधून मोठी धावसंख्या उभारू शकतो.