पोर्ट ऑफ स्पेन। वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (14 ऑगस्ट) क्विन्स पार्क ओव्हल स्टेडीयमवर पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला.
हा सामना वेस्ट इंडीजचा अनुभवी सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलचा शेवटचा सामना असल्याची चर्चा होती. मात्र खूद्द गेलनेच मी अजून निवृत्ती जाहीर केलेली नाही असे सांगत या चर्चेला तुर्तास विराम दिला आहे.
गेलने या सामन्यात तुफानी अर्धशतक केले. त्याने 41 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकारांसह 71 धावांची खेळी केली. पण त्याला 71 धावांवर खलील अहमदने बाद केले.
गेलने बाद झाल्यानंतर बॅटवर हेल्मेट ठेवून सर्वांना अभिवादन केले. तसेच वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनीही उभे राहत त्याचे कौतुक केले. त्यामुळे सर्वांना गेल निवृत्ती घेत असल्याचे वाटल्याने त्याच्या निवृत्तीची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु झाली. काही आजी-माजी क्रिकेटपटूंनीदेखील गेलला निवृत्तीबद्दल शुभेच्छा दिल्या.
मात्र सामना संपल्यानंतर वेस्ट इंडीज क्रिकेटने त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये गेलने स्पष्ट केले की त्याने अजून तरी त्याची निवृत्ती घोषित केलेली नाही. तो म्हणाला, ‘मी अजून निवृत्ती घोषित केलेली नाही. मी अजून पुढील कोणती नोटीस येईपर्यंत वेस्ट इंडीज क्रिकेटबरोबर आहे.’
The question you've all been asking..has @henrygayle retired from ODI cricket?👀 #MenInMaroon #ItsOurGame pic.twitter.com/AsMUoD2Dsm
— Windies Cricket (@windiescricket) August 14, 2019
बुधवारी झालेल्या या सामन्यात गेलच्या अर्धशतकी खेळीच्या मदतीने वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना 35 षटकात 7 बाद 240 धावा केल्या होत्या. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 35-35 षटकांचा करण्यात आला.
तसेच भारताला डकवर्थ लूईस नियमानुसार 35 षटकात 255 धावांचे आव्हान देण्यात आले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 32.3 षटकात पूर्ण केला.
वेस्ट इंडीज-भारत तिसऱ्या वनडेनंतर आजी-माजी क्रिकेटपटूंनी गेलला दिलेल्या निवृत्तीच्या शुभेच्छा –
Signs off in style. In his own inimitable style. Chris Gayle bossed in his last game too. #WIvIND
— Aakash Chopra (@cricketaakash) August 14, 2019
https://twitter.com/KP24/status/1161718196677877761
Wish You Happy Retirement Life Universal Boss, It Was a Pleasure to Play alongside You! 😃👍🏻 @henrygayle pic.twitter.com/oWHG6Px34P
— Wriddhiman Saha (@Wriddhipops) August 14, 2019
Hope you’ll enjoy every moment of ur retirement. U will be missed but never forgotten @henrygayle 👍 Thank u for entertainment 👏 pic.twitter.com/W19Qm4xmNM
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) August 14, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–असा पराक्रम करणारा श्रेयस अय्यर युवराजनंतरचा दुसराच भारतीय!
–या दिग्गज कर्णधारांच्या यादीत आता विराट कोहलीचे नाव सन्मानाने घेतले जाणार!
–टॉप ५: ‘रनमशीन’ विराट कोहलीने शतकी खेळी बरोबरच केले हे खास ५ विक्रम