आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन देशातील पारंपारिक सामने पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील द्वंद्व क्रिकेटच्या तीनही प्रकारात चांगले रंगते. या दोन्ही संघातील कसोटी मालिकेला मोठी परंपरा असून त्याला ऍशेस असे नाव दिले आहे. मात्र, वेस्ट इंडिज संघाचा अनुभवी सलामीवीर ख्रिस गेल याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रतिस्पर्धी सर्वात मोठी असल्याचे म्हटले आहे.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादमध्ये 15 ऑक्टोबरला होईल. जेव्हाजेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होतो तेव्हा दोन्ही देशांच्या चाहत्यांना आपल्या संघाचा पराभव होऊ नये, अशी इच्छा असते. त्यामुळे दोन्ही संघांवर दडपण असते.
गेलच्या मते दोन्ही देशांमधील ही स्पर्धा खूपच मोठी आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तो म्हणाला, “भारत आणि पाकिस्तानचा सामना ऍशेसपेक्षाही मोठा आहे. जागतिक स्तरावर करोडो लोक तो पाहतात. 15 ऑक्टोबरला काय होते हे पाहणे मनोरंजक असेल. हा सामना मी नक्की बघेन.”
वनडे विश्वचषकाचा विचार केल्यास भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध अद्याप एकही सामना हरलेला नाही. उभय संघ विश्वचषकात आत्तापर्यंत सात वेळा आमने-सामने आले असून, प्रत्येक वेळी भारतीय संघाने विजय संपादन केलेला आहे.
याआधी गेलने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील संघांबाबतही भविष्यवाणी केली आहे. गेलच्या मते, भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघ 2023 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. गेलने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांना उपांत्य फेरीतील संभाव्य संघांमध्ये ठेवलेले नाही.
(Chris Gayle Said India Pakistan Match Is Bigger Than Ashes)
महत्वाच्या बातम्या-
‘मी तर हार्दिक पंड्याच्या आसपासही नाही…’, संघातून ड्रॉप करण्यावर प्रमुख खेळाडूचे खळबळजनक विधान
वनडे विश्वचषकात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? ‘हे’ आहेत पाच पर्याय