भारतीय संघाचा माजी सलामीवीर शिखर धवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटल्यानंतर एका आठवड्याच्या आता मैदानावर परतला आहे. वास्तविक, धवननं आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, ज्यानंतर तो आता लिजेंड्स लीग मध्ये खेळणार आहे. हा डावखुरा फलंदाज 20 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या लिजेंड्स लीग क्रिकेट 2024 मध्ये खेळताना दिसेल.
आज (29 ऑगस्ट) दिल्लीत लिजेंड्स लीग क्रिकेटच्या तिसऱ्या हंगामासाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावात जगभरातील अनेक निवृत्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. मात्र, लिलावात धवनच्या नावाची बोली लागली नाही, कारण गुजरात जायंट्स संघानं त्याला थेट साईन करून आपल्या संघाचा भाग बनवलं.
शिखर धवन आता लिजेंड्स लीग क्रिकेट 2024 मध्ये गुजरात संघासाठी खेळताना दिसणार आहे. धवनशिवाय ख्रिस गेल आणि लेंडल सिमन्ससारखे दिग्गज खेळाडूही या संघाचा भाग आहेत. गुजरातनं गेलला राईट टू मॅच (RTM) वापरून आधीच संघात कायम ठेवलं होतं. त्याच वेळी, फ्रँचायझीनं सिमन्सला लिलावात 37.56 लाख रुपयांना विकत घेतलं. याशिवाय गुजरातकडे मोहम्मद कैफ आणि एस श्रीशांतसारखे खेळाडू देखील आहेत.
शिखर धवन व्यतिरिक्त, यावेळी दिनेश कार्तिक देखील लिजेंड्स लीग क्रिकेट 2024 मध्ये खेळताना दिसणार आहे. त्यानं जूनमध्ये सर्व फॉरमॅटच्या क्रिकेटला अलविदा केलं होतं. कार्तिकला पार्ल रॉयल्सनं SA20 च्या आगामी हंगामासाठी करारबद्ध केलं आहे. तर लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये त्याला ‘दक्षिणी सुपरस्टार्स’नं साइन केलं. फ्रँचायझीनं कार्तिकला संघाचं कर्णधारपदही दिलं आहे. याआधी कार्तिक आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करताना दिसला होता. त्याच्या संघात केदार जाधव आणि पार्थिव पटेल सारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
हेही वाचा –
आयपीएल 2024 ला मिळाली विक्रमी लोकप्रियता! जिओ सिनेमानं मोडले पूर्वीचे सर्व रेकॉर्ड
फिंच-गुप्टिलपासून आरपी सिंग दिलशानपर्यंत; लिजेंड्स लीगमध्ये हे दिग्गज खेळाडू राहिले अनसोल्ड
काश्मीरमध्ये तब्बल 38 वर्षांनंतर क्रिकेट परतणार! धवन-कार्तिकसारखे दिग्गज दिसतील ॲक्शनमध्ये