जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 23 डिसेंबर रोजी होणार आहे. या लिलावासाठी 405 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर झालीये. लिलावाला सुरुवात होण्याआधी आयपीएलचा व वेस्ट इंडीजचा दिग्गज क्रिकेटपटू राहिलेला ख्रिस गेल याने पंजाब किंग्स संघाच्या रणनीतीवर ताशेरे ओढले आहेत.
आयपीएलमधील सर्वात यशस्वी विदेशी क्रिकेटपटूंच्या यादीत असलेला गेल मागील दोन वर्षापासून आयपीएलमध्ये खेळताना दिसत नाही. यंदाही त्याने लिलावात आपले नाव दिले नसले तरी, तो प्रसारण वाहिनीसाठी एक्सपर्ट म्हणून आपली भूमिका बजावताना दिसेल. आयपीएल लिलावाच्या आधी झालेल्या प्रसारण वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्याने आपला पूर्वाश्रमीचा संघ पंजाब किंग्सवर जोरदार टीका केली. गेल म्हणाला,
“पंजाब संघाची रणनीती अत्यंत बेकार असते. ते नेहमीच आपल्या संघात काटछाट करताना दिसतात. संघ जिंकला तरी आणि पराभूत झाला तरी त्यांची हीच पद्धत राहिली आहे. मला वैयक्तिकरित्या मयंक अगरवाल याच्यासाठी वाईट वाटते. त्याला ज्या प्रकारची वागणूक मिळाली ती चुकीची आहे.”
पंजाब किंग्स संघाने आयपीएल 2023 लिलावाआधी मागील हंगामात संघाचे नेतृत्व केलेल्या मयंक अगरवाल याला रिलीज केले होते. यापूर्वी देखील पंजाब संघ असे निर्णय घेण्यासाठी ओळखला जातो. आयपीएल लिलावात पंजाब संघाकडे दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक रक्कम शिल्लक असेल. 32.20 कोटी रुपयांमध्ये त्यांना नऊ खेळाडू घ्यावे लागतील. यामध्ये तीन विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. पंजाबने हंगामासाठी शिखर धवन याला आपला कर्णधार घोषित केले. तर, इंग्लंडचे विश्वविजेते प्रशिक्षक ट्रेव्हर बायलिस यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी असेल.
(Chris Gayle Slams Punjab Kings Foe Auction Strategy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BANvIND: ‘मॅचविनर’ कुलदीपला बाहेर केल्याने भडकले चाहते, कर्णधार राहुलची लावली क्लास
पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाला विजेतेपद