इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात वेस्ट इंडीजचा धमाकेदार फलंदाज ख्रिस गेल खेळला नव्हता. गेलने आयपीएलमधून माघार घेतल्यामुळे चाहत्यांचीही चांगलीच निराशा झाली होती. चाहत्यांची हीच निराशा यावर्षी मात्र दूर होणार आहे. कारण गेल क्रिकेट खेळण्यासाठी पुन्हा एकदा भारतात येत आहे. परंतु यावर्षी तो आयपीएल नाही, तर लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळणार आहे. स्पर्धेच्या आयोजकांकडून याविषयी माहिती मिळाली आहे.
मागच्या वर्षी लिजेंड्स लीग क्रिकेटचा पहिला हंगाम खेळला गेला होता आणि यावर्षी या स्पर्धेचा दुसरा हंगाम खेळवला जाणार आहे. स्पर्धेची सुरुवात १७ सप्टेंबर २०२२ पासून होईल आणि अंतिम सामना ४ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. दरम्यानच्या २२ दिवसांमध्ये क्रिकेटविश्वातील माजी दिग्गज चाहत्यांचे मनोरंजन करण्याच्या प्रयत्नात असतील. यावर्षी ही स्पर्धा अधिकच रोमांचक बनणार आहे, कारण ख्रिस गेल (Chris Gayle) या स्पर्धेत सहभागी होत आहे.
लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये जगभारातील दिग्गज सहभागी होऊ शकतात, ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकट सोडले आहे. ख्रिस गेल वेस्ट इंडीज संघाचा एकेकाळचा दिग्गज फलंदाज आहे, पण मागच्या मोठ्या काळापासून त्याला संघात संधी मिळाली नाहीये. असे असले तरी, लिजेंट्स लीग क्रिकेटच्या ट्वीटर खात्यावरून गेल यावर्षी यी स्पर्धेत खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.
लिजेंड्स लीग क्रिकेटचे सहसंस्थापक आणि सीईओ समन रहेजा म्हणाले की, “ख्रिस गेल जोडला गेल्यामुळे आमच्या लीगची उंची अजूनच वाढली आहे आणि आता अधिक विस्फोटक क्रिकेट पाहायला मिळेल. मला पूर्ण अपेक्षा आहे की चाहते आणि जे क्रिकेट पाहणारे आहेत, त्यांना आता लिजेंड्स लीगमध्ये अधिपेक्षा जास्त मनोरंजक क्रिकेट पाहायला मिळेल.”
गेलव्यतिरिक्त मोहम्मद कैफ, आरपी सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, चामिंडा वास असे अनुभवी क्रिकेपटू या सपर्धेत खेळतील. या सर्व खेळाडूंनी ते लीगच्या आगामी हंगामात खेळणार असल्याची पुष्टी केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराटला टी२० विश्वचषकातूनही वगळणार! बीसीसीआयच्या मोठ्या अधिकाऱ्याचे खळबळजनक वक्तव्य
चौथ्या टी२०पूर्वी कार्तिकची वेस्ट इंडिजला चेतावणी; म्हणाला, ‘मालिका जिंकण्याच्या हेतूनेच…’
‘या’ खेळाडूवर रोहित-द्रविडचा अन्याय! टी२० विश्वचषकासाठी दावा ठोकण्याची देत नाहीयेत एकही संधी