---Advertisement---

गेलची तोडफोड फलंदाजी! गगनचुंबी षटकाराने तोडली खिडकीची काच, व्हिडिओ तुफान व्हायरल

On: शनिवार, ऑगस्ट 28, 2021 3:32 AM
---Advertisement---

वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. नुकताच कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेचा धमाल सुरू आहे. ख्रिस गेल या स्पर्धेत सेंट किट्स एंड नेविस संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या संघाकडून खेळताना त्याने एक गगनचुंबी षटकार लगावला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वॉर्नर पार्कमध्ये गुरुवारी (२६ ऑगस्ट ) बारबाडोस रॉयल्स आणि सेंट किट्स एंड नेविस या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात सलामीला येणारा फलंदाज तिसऱ्या क्रमांकांवर फलंदाजी करण्यासाठी आला होता.या दरम्यान त्याने जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर अप्रतिम षटकार लगावला,जो चेंडू सरळ साईट स्क्रीनच्या वर असलेल्या खिडकीला जाऊन लागला. या जोरदार षटकाराने त्या खिडकीची काच तुटून पडली. या षटकाराचा व्हिडिओ कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

या सामन्यात बारबाडोस रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना सेंट किट्स एंड नेविस संघाला ५ बाद १७५ धावा करण्यात यश आले होते. सेंट किट्स एंड नेविस संघाकडून रूदरर्फर्डने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली होती. कर्णधार ब्रावोने नाबाद ४७ आणि फिन ॲलेनने नाबाद १९ धावांची खेळी केली होती. तर विस्फोटक ख्रिस गेलने १२ धावांची खेळी केली.(Chris Gayle window breaking six,watch video)

या धावांचा पाठलाग करण्यासाठी बारबाडोस रॉयल्स संघाकडून शाय होपने सर्वाधिक ४४ तर आजम खानने २८ धावांची खेळी केली. परंतु ही खेळी संघाला सामना जिंकून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही.बारबाडोस रॉयल्स संघाला २० षटक अखेर ७ बाद अवघ्या १५४ धावा करता आल्या. या सामन्यात सेंट किट्स एंड नेविस संघाने २१ धावांनी विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘निवडीवर भाष्य करायला आवडणार नाही’, हेडिंग्ले कसोटीत अश्विनला न खेळवण्याच्या निर्णयावर शमीचे उत्तर

कोहलीचे स्केच दाखवणाऱ्या चाहत्याला पाहून, इंग्लिश प्रेक्षकांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, फोटो व्हायरल

दिनेश कार्तिकने केला समालोचनाला रामराम! ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---