सेंट किट्स | इंग्लंड विरुद्ध विंडीज दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडने तब्बल १३७ धावांनी विजय मिळवला. हा विजय मिळवता इंग्लंड संघाने विंडीजला ११.५ षटकांत ४५ धावांवरच सर्वबाद केले.
विंडीजविरुद्ध गोलंदाजी करताना इंग्लंडकडून ख्रीस जाॅर्डन या खेळाडूने २ षटकांत ६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. परंतु त्याला इंग्लंडचा कर्णधार ऑयन माॅर्गनने पुढे गोलंदाजी करण्याची संधी दिली नाही.
६ षटकांत विंडीजच्या ६ बाद २२ धावा झाल्या होत्या आणि त्यांचे ४ फलंदाज बाद होण्याचे बाकी होते. तेव्हा जाॅर्डनची केवळ २ षटकं टाकून झाली होती. यामुळे त्याला जर पुढे संधी मिळाली असती तर अजंता मेंडिसचा ६ विकेट्सचा विक्रम मोडण्याची संधी होती.
अजंता मेंडिसने २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२०त १६ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या तर दुसऱ्या बाजूला याच मेंडिसने २०१२मध्ये झिंबांब्वे विरुद्ध ८ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या.
काल ही मोठी संधी जाॅर्डनला होती. परंतु त्याची ही संधी अखेर हुकली.
https://twitter.com/SikandrKhosa/status/1104292857622470658
Never mind bowling out Chris Jordan in an attempt to get a 5-fer, Eoin Morgan should have given himself an over to get the last Windies wicket #village #WIvENG
— Jimmy (@AlviroPatterson) March 9, 2019