---Advertisement---

रोहित-कोहलीला बांग्लादेशी स्टारकडून मिळाली खास भेट, विराट म्हणाला ‘खूब भलो आची’

---Advertisement---

नुकतेच भारतीय क्रिकेट संघाने बांग्लादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकला. यानंतर बांग्लादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिकाही जिंकण्यात भारताला यश आले. कसोटी मालिकेतील पहिला सामना 280 तर दुसरा सामना 7 विकेट्स राखून भारताने एकतर्फी जिंकल्या. कानपूर कसोटीत बांग्लादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन मिराजने रोहित शर्माला दोन्ही डावात बाद केले होते. आता सामना संपल्यानंतर मेहदी हसनने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला खास बॅट भेट दिली आहे.

मेहदी हसन मिराजने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला प्रत्येकी एक बॅट भेट दिली. रोहित शर्माला बॅट देताना मेहदी म्हणाला, “मी रोहित भाईसोबत आहे आणि मी त्यांना माझ्या कंपनीची बॅट भेट दिली आहे. हे माझे स्वप्न होते आणि आता मी खूप आनंदी आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by MKS Sports (@official.mkssportsbd)

रोहितने मेहदीला त्याच्या नव्या सुरुवातीबद्दल शुभेच्छाही दिल्या आणि म्हणाला, “मी मेहदीला बर्याच काळापासून ओळखतो. तो एक महान क्रिकेटर आहे आणि मला अभिमान आहे की त्याने स्वतःचा बॅटचा व्यवसाय सुरू केला आहे. मी त्याला शुभेच्छा देतो.” आशा आहे की त्याची कंपनी खूप यशस्वी होईल.”

जेव्हा मेहदी हसन विराट कोहलीला बॅट देत होता, तेव्हा कोहली बंगालीमध्ये म्हणाला “MKS बॅट खूब भलो आची” त्यानंतर दोघेही हसायला लागले. तेव्हा विराट कोहली म्हणाला, “ही खूप चांगली बॅट आहे. तुला शुभेच्छा. तुम्ही लोक उत्तम बॅट बनवत आहात आणि त्या सर्व क्रिकेटपटूंसाठी बनवत राहा. चांगल्या दर्जाचे सामान द्या.”

 

मेहदी हसन मिराजने आपल्या मित्रांसोबत बॅट बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. एमकेएस स्पोर्ट्स असे त्याचे नाव आहे. मेहदी हसन एमकेएस स्पोर्ट्सच्या सोशल मीडिया पेजवर यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

हेही वाचा-

’11 षटकार, 9 चौकार’, न्यूझीलंडच्या दिग्गजाची वादळी शतकी खेळी, संघाचा दणदणीत विजय
महिला टी-20 वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात; मॅच टाइमिंग, लाइव्ह स्ट्रिमिंगपासून सर्वकाही जाणून घ्या
रोहित शर्मा की एमएस धोनी, भारताचा सर्वोत्तम कर्णधार कोण? हरभजन सिंग म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---