एकीकडे भारतात आयपीएल २०२२ या टी२० लागचा थरार सुरू असताना दुसरीकडे इंग्लंडमध्ये टी२० ब्लास्ट ही स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेतील एक सामना शुक्रवारी (२७ मे) नॉर्थम्पटनशायर विरुद्ध डर्हम संघात खेळला गेला. या सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली, ज्याने क्रिकेटप्रेमींना चकित केले आहे. नॉर्थम्पटनशायरकडून फलंदाज ख्रिस लिन याने मॅच विनिंग फलंदाजी केली. त्याने आपल्या शानदार अर्धशतकी खेळीदरम्यान एक गगनचुंबी षटकार मारला, जो थेट स्टेडियमबाहेर जाऊन पडला. त्याच्या या जबरदस्त षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ख्रिस लिनने (Chris Lynn) नॉर्थम्टनशायरकडून (Northamptonshire vs Durham) सलामीला फलंदाजी करताना ४६ चेंडूत ८३ धावांची झंझावाती खेळी केली. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून ८ षटकार आणि ४ चौकार निघाले. यातील एक षटकार त्याने जोराने स्टेडियमबाहेर मारला. या षटकाराचा चेंडू हवेतून स्टेडियमबाहेरील एका घराच्या बॅकयार्डमध्ये जाऊन पडला.
ख्रिस लिनने हा शॉट मारल्यानंतर कोणालाही माहिती नव्हते की, चेंडू कुठे जाऊन पडला आहे. थोड्या वेळानंतर सीसीटीव्ही कॅमेरात तपासल्यानंतर चेंडू स्टेडियमबाहेरील एका घरात पडल्याचे समजले. ख्रिस लिनच्या या षटकाराचा (Chris Lynn Six) व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
Come for the Chris Lynn bombs, stay for CCTV footage showing where one of the sixes ended up 😂
📹 @NorthantsCCC / @cobbleysaint pic.twitter.com/rjKPSPU5L9
— 7Cricket (@7Cricket) May 28, 2022
https://twitter.com/cobbleysaint/status/1530256874217644035?s=20&t=r6Vx8bxNDfXDrhxEnfoJlg
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना नॉर्थम्पटनशायरने २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर २२३ धावा केल्या. नॉर्थम्पटनशायरकडून ख्रिस लिनने सर्वाधिक ८३ धावा केल्या. तसेच बेन करननेही ७१ धावांचे योगदान दिले. या डावात डर्हमचा कर्णधार ऍश्टन टर्नरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात डर्हमकडून सलामीवीर ग्राहम क्लार्कने ५४ धावांची खेळी केली. तसेच डेविड बेडिंघम (३१ धावा), मिचेल जोन्स (२६ धावा), कर्णधार ऍश्टन टर्नर (२१ धावा) यांनीही २० पेक्षा जास्त धावा केल्या. इतर फलंदाजांना विशेष खेळी करता न आल्याने डर्हम संघाला १९२ धावाच करता आल्या. या डावात फ्रेडी हेल्डरिचने ३ विकेट्स घेतल्या. तसेच जोशुआ कॉब आणि बेन सँडरमननेही २ विकेट्सचे योगदान दिले.
महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘बॅट बॅगमध्ये पॅक कर आणि कुटुंबासोबत वेळ घालव’, इंग्लंडच्या माजी दिग्गजाचा विराटला सल्ला
‘मला कधीच वाटले नव्हते…’, फिरकीपटूंविरुद्ध खेळण्याबाबत काय म्हणाला गुजरातचा मॅचविनर खेळाडू?