---Advertisement---

“मी आयपीएलसाठी सज्ज”, राजस्थानच्या अष्टपैलूने फुंकले रणशिंग

On: मंगळवार, मार्च 30, 2021 8:04 PM
---Advertisement---

जगातील सर्वात प्रसिद्ध व्यावसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलचा चौदावा हंगाम ९ एप्रिलपासून सुरू होत आहे. या हंगामासाठीच्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ख्रिस मॉरिस मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. राजस्थान रॉयल्ससाठी तो या हंगामात खेळताना दिसेल. जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत त्याच्यावर राजस्थानच्या गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी असेल.

यावेळी नेतृत्व करण्यास सज्ज
सध्या मॉरिस राजस्थान संघासोबत मुंबई येथे क्वारंटाईन आहे. आपल्या रूममधून झालेल्या आभासी पत्रकार परिषदेत बोलताना तो म्हणाला, “आयपीएलमध्ये आत्तापर्यंत मी ज्या संघांसाठी खेळलो आहे, त्या सर्व संघांसाठी माझी भूमिका सुरुवातीच्या आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाची राहिली आहे. यामध्ये काहीही बदल होणार नाही. यापूर्वी साथीला काही इतर गोलंदाज असायचे मात्र यावेळी मलाच नेतृत्व करायचे आहे. मात्र मी त्यासाठी सज्ज आहे.”

“थोडाफार दबाव असतोच”
मॉरिस या आयपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू म्हणून मैदानात उतरेल. या गोष्टीचा दबाव असतो का असे विचारल्यानंतर तो म्हणाला, “दबाव नसतो असे म्हटले तर, हे खोटे वाटेल. कारण इतक्या मोठ्या रकमेचा थोडाफार दबाव नक्कीच असतो. मी स्वतःला भाग्यशाली मानतो की, मागील काही काळापासून मला मोठी रक्कम मिळत आहे. मात्र, शेवटी चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे असते.”

सर्वात महागडा खेळाडू ठरला होता मॉरिस
चेन्नई येथे झालेल्या आयपीएल लिलावात मॉरिस सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पछाडत त्याला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनवत १६.२५ कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. वेगवान गोलंदाजी व आक्रमक फटकेबाजी करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे.
मागील तीन हंगाम गाजवणाऱ्या जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत त्याच्यावर गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी असेल. आर्चरने कोपराच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या:

फक्त ९० मिनिट! यावर्षी आयपीएल होणार या नव्या नियमासह

असे कुठे असते होय! आव्हान माहित नसतानाच फलंदाजांनी केली दिड षटके फलंदाजी

ना धोनी ना रोहित ना कोहली; हे आहेत आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---