---Advertisement---

सिटी कप २०२१: सिटी एफ.सी. पुणे संघाची दणदणीत सलामी

On: शनिवार, नोव्हेंबर 13, 2021 10:23 PM
---Advertisement---

पुणे। यजमान सिटी एफ.सी. पुणे संघाने प्रितिश बाबर आणि लेऑन विक्रम यांच्या दोन गोलच्या जोरावर एएफए सॅमफोर्ड एफसी संघाचा ६-१ असा पराभव करून सिटी करंडक २०२१ स्पर्धेत विजयी सलामी दिलीय.

ही स्पर्धा मोशी येथील सिटी स्पोर्टस अरेना येथे सुरू आहे. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात येत आहे.

घरच्या स्पर्धेत आणि मैदानावर खेळताना लेऑन याने २५व्या मिनिटाला सिटी एफ.सी. पुणे संघाचे खाते उघडले. त्यानंतर त्यांनी आपल्या खेळात सातत्य राखताना मध्यंतराला १-० ही आघाडी कायम राखली.

उत्तरार्धात सिटी एफ.सी. पुणे संघाने कमालीचा आक्रमक खेळ पुढच्या ३५ मिनिटात ५ गोल केले. सत्विक नायक याने ४२व्या, प्रितेशने ४७ आणि ७१व्या मिनिटाला गोल केल्यावर लेऑनने ६५व्या मिनिटाला पेनल्टी किकवर संघाचा पाचवा आणि वैयक्तिक दुसरा गोल केला. त्यानंतर स्वप्निल महामुनी याने ५५व्या मिनिटाला गोल करून संघाचे विजयाधिक्य वाढेल याची काळजी घेतली.

मात्र, शुभम पाटील याने ६३व्या मिनिटाला गोल करून सॅमफोर्डचे खाते उघडले. या गोलने त्यांना केवळ सिटी एफसीचे गोलाधिक्य कमी केल्याचे समाधान लाभले.

स्पर्धेचे उदघाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू परेश शिवलकर, जीएमस इंडियाचे संचालत संजय पन्वर, नकलबेल स्पोर्टसचे संचालक आशिष पांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी राष्ट्रीय पंच गंगाराम चौधरी आणि सिटी एफसी पुणेचे अध्यक्ष शशांक कर्णिक उपस्थित होते.

निकाल –
सिटी एफ.सी. पुणे ६ (लेऑन विक्रम २५, ६५वे मिनिट, सत्विक नायक ४२वे मिनिट, प्रितिश बाबर ४७, ७१वे मिनिट, स्वप्निल महामुनी ५५वने मिनिट) वि.वि. एएफए सॅमफोर्ड एफ. सी. १ (शुभम पाटिल ६३वे मिनिट)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---