भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना 2 सप्टेंबरपासून ओव्हल येथे खेळला जाणार आहे. इंग्लंडने लीड्समध्ये पाहुण्या संघाचा पराभव करून 5 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ सामना असेल. कारण हा सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेईल. दरम्यान भारतासाठी अडचण अशी आहे की, ओव्हलमधील त्यांची कामगिरी फार चांगली नाही.
भारताने 50 वर्षांपासून येथे कसोटी जिंकलेली नाही. भारतीय संघाने 1971 मध्ये या मैदानावर पहिला कसोटी विजय नोंदवला होता. पण त्यानंतर भारताला या मैदानावर विजय नोंदवता आलेला नाही. या मैदानावर भारताने मागील तीनही कसोटी सामने गमावले आहेत. जर यावेळी भारताचा येथे पराभव झाला तर 2007 नंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच राहील. यात हवामानाची भूमिका देखील खूप महत्वाची असेल. कारण इंग्लंडमध्ये हवामान कधी बदलेल? हे अजिबात सांगता येत नाही.
हेडिंग्ले येथील हवामान चांगले राहिले होते आणि कसोटी सामन्यात बराच काळ सूर्यप्रकाश राहिला. त्यामुळे चार दिवसात इंग्लंडने भारताला एका डावाच्या फरकाने पराभूत केले. पण केनिंग्टन ओव्हल स्टेडियम, लंडन जेथे चौथी कसोटी खेळली जाणार आहे, तेथे हवामान समस्या निर्माण करू शकते. येथील हवामानासंदर्भात पुढील काही दिवसांचा अंदाज तसाच वर्तवण्यात आला आहे. बीसीसीआयने ओव्हल मैदानाचा फोटोही शेअर केला आहे.
Hello and welcome to The Oval. Our venue for the 4th Test against England.
It's been a damp morning so far.#ENGvIND pic.twitter.com/LmeFqxjGkw
— BCCI (@BCCI) August 31, 2021
मंगळवारीही (31 ऑगस्ट)) येथे ढगाळ वातावरण होते आणि हलका पाऊस झाला होता. आता गुरुवारपासून (02 सप्टेंबर) सुरू होणाऱ्या ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवसापासून म्हणजेच 4 सप्टेंबरपासून हवामान खराब होऊ शकते. या दिवशी पावसाची 50 टक्के शक्यता आहे. त्यानंतरच्या दिवशी म्हणजेच कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ढगांच्या गडगडाट आणि विजांसह मुसळधार पाऊस पडू शकतो. सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशीही पाऊस खेळात अडथळा आणू शकतो.
अशा स्थितीत या सामन्यात नाणेफेक खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकते. हे आपण हेडिंग्लेमध्येही पाहिले आहे. जिथे विराट कोहलीने वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थिती असूनही प्रथम फलंदाजी केली आणि भारतीय संघ पहिल्या डावात 78 धावांवर बाद झाला आणि नंतर सामनाही गमावला.
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात ‘या’ वेगवान गोलंदाजाची निवड, करणार कसोटी पदार्पण
सलग ३ शतके ठोकत जो रूटचे कसोटी क्रमवारीत वर्चस्व, रोहितनेही विराटला केले ओव्हरटेक