---Advertisement---

कपिल देव यांच्या हेअर स्टाईलवर दोनवेळचा विश्वविजेेता कर्णधार झाला फिदा! दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

On: गुरूवार, ऑक्टोबर 21, 2021 5:12 PM
---Advertisement---

भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८३ विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाला पराभूत केले होते. यापूर्वी क्लाइव्ह लॉयड यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने सलग २ वेळेस जेतेपद आपल्या नावावर केले होते. हे दोघेही स्टार खेळाडू त्यावेळी प्रचंड चर्चेत होते. दरम्यान पुन्हा एकदा हे दोन्ही खेळाडू चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले आहे.

कपिल देव सध्या आपल्या आगळ्या-वेगळ्या हेअरस्टाईल मुळे चर्चेत आहेत. त्यांच्या हटके हेअर स्टाईलचे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, वरिष्ठ पत्रकार बोरिया मजुमदार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते क्लाइव्ह लॉयड यांना कपिल देव यांच्या हेअर स्टाईलबद्दल प्रश्न विचारताना दिसून येत आहेत.

बोरीया मजुमदार यांनी क्लाइव्ह लॉयड यांच्यासोबत चर्चा करताना म्हटले की, “मी आणि क्लाइव्ह कपिल पाजींच्या हेअर स्टाईलबद्दल चर्चा करत होतो. तर क्लाइव्ह तुम्हाला कपिल देव यांची हेअर स्टाईल कशी वाटली?”

याचे उत्तर देताना क्लाइव्ह लॉयड म्हणाले की, “कपिल देव यांची हेअर स्टाईल एका बॉलिवुड स्टार सारखी वाटतेय. ते खूप आकर्षक वाटतंय.” त्यानंतर बोरिया मजुमदार म्हणाले की, “मला क्लाइव्ह लॉयड आणि कपिल पाजी यांच्यात झालेला संवाद ऐकायला नेहमी आवडतो. आशा करतो की,पुढे ही असा संवाद ऐकायला मिळेल.”

तसेच कपिल देव यांनी देखील टी२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी भारतीय संघाच्या विजय मिळवण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देत म्हटले की, “मी त्या प्रश्नाचे उत्तर देत नाही, ज्याचे उत्तर तुम्हाला माहीत आहे. मी तर असे म्हणेल की, भारतीय संघाने टॉप ४ मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि हेच त्यांचे पहिले लक्ष्य असायला हवे. त्यानंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा नव्याने सुरू होते. भारतीय संघ टॉप ४ मध्ये स्थान मिळवणारा संघ आहे.”

महत्त्वाच्या बातम्या – 

कुणी समालोचक तर कुणी पोलीस दलात, जाणून घ्या २००७ च्या विश्वचषक संघाचे महारथी काय करत आहेत

“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला

मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी कर्नाटकचा संघ जाहीर! आयपीएल गाजवणाऱ्या बड्या नावांचा समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---