मागील काही दिवसांपासून बीसीसीआय आणि सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समीती (सीओए) मध्ये मतभेद चालू आहेत.
बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी 22 जूनला झालेल्या सीओएच्या मर्जी विरुद्ध सर्वसाधारण सभा बोलावली होती. या सभेमध्ये अनेक प्रस्तावही मंजूर करण्यात आले होते. या प्रस्तावात देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळांडूच्या वेतन वाढीचाही प्रस्ताव होता.
पण आता विनोद राय अध्यक्ष असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समीतीने या सभेला बेकायदेशीर घोषित केले आहे. त्याचबरोबर त्यांनी या सभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळांडूच्या वेतन वाढीच्या प्रस्तावासह अनेक प्रस्तावांनाही नकार दिला आहे.
बीसीसीआयच्या आधिकाऱ्यांनी फक्त प्रसिद्धीसाठी हा प्रस्ताव मंजूर केल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समीतीचे म्हणणे आहे.
याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समीतीच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘ही सभा प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे. तसेच हा प्रस्ताव बीसीसीआयच्या आधिकाऱ्यांचा पब्लिसिटी स्टंट आहे. क्रिकेटपटूच्या वेतनाचा जो प्रस्ताव सीओएने पास केला आहे तोच मंजूर होईल.’
याआधी मार्चमध्ये सीओएने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या 100 टक्के वेतन वाढीचा प्रस्ताव ठेवला होता जो बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत मंजूरही करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–आयर्लंडचे प्रतिनिधित्व केलेल्या या भारतीय खेळाडूने असा केला होता संघर्ष
–आयसीसी टी20 क्रमवारीत भारताचे स्थान वधारले; आॅस्ट्रेलियाला टाकले मागे
–Video: एमएस धोनीच्या चिमुकलीचा हार्दिक पंड्याला जोरदार पाठिंबा






