काही दिवसांपूर्वीच १९ वर्षाखालील विश्वचषकासाठी (U-19 World Cup) भारतीय संघ जाहीर झाला आहे. या संघात निवड झालेल्या अनेक खेळाडूंचा इथपर्यंतचा प्रवास खूप कठीण परिस्थितीतून झाला आहे. अनेकांच्या प्रवासाची कथा वेगवेगळी आहे. या संघात गाजियाबादमधल्या त्रिलोकनाथ क्रिकेट अकादमीचे (Triloknath Cricket Academy) २ खेळाडू संघात सामील करण्यात आले आहेत.
यष्टिरक्षक फलंदाज आराध्य यादव (AaradhyaYadav) आणि फलंदाज सिद्धार्थ यादव (Siddarth Yadav) यांना संघात निवडण्यात आलं आहे. या अकादमीचे प्रमुख प्रशिक्षक दिल्लीस्थित अजय शर्मा (Ajay Sharma) आहेत. अजय शर्मा यांनी २०१६ मध्ये सेंट्रल वेअर हाऊजिंगच्या मदतीने क्रिकेट अकादमी सुरु केली, जेणेकरून खेळाडूंना चांगला प्रशिक्षण तिथेच मिळेल आणि त्यांना सारखं सारखं दिल्लीला सरावासाठी जावं लागणार नाही.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार अजय शर्मा म्हणाले, “सोनेट क्लबमध्ये तारक सरांचा मी सहाय्यक प्रशिक्षक होतो. एका स्पर्धेदरम्यान त्यांची भेट आराध्य यादवचे वडील अजय यादव यांच्याशी झाली. आराध्यचे वडील दिल्ली पोलीसमध्ये असून त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना क्रिकेटची गोडी लावली. आराध्यचा मोठा भाऊ अंकित सलामीवीर आहे. माझ्याजवळ हे दोघे जण यायला लागले. पण कामामुळे मला त्यांना वेळ देता येत नव्हता. दोघे जण उत्कृष्ट खेळाडू आहेत. मी विचार केला की, या दोघांना नीट मार्गदर्शन मिळालं तर हे भारतीय संघासाठी खेळतील.”
याबरोबरच अजय शर्मा यांनी त्यांच्या मुलाला क्रिकेटमध्ये खूप पुढे न जाता आल्याबद्दल खंत देखील व्यक्त केली. त्यांचा मुलगा मनन शर्मा दिल्ली संघाकडून रणजी ट्रॉफी खेळला होता. तसेच २०१० साली १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार देखील तो होता. तसेच त्यांनी सांगितले की, आराध्य आणि अंकित या दोघांमध्ये ते त्यांच्या मुलाला पाहातात.
व्हिडिओ पाहा – आख्खी कारकिर्द संपली, पण पठ्ठे कधीही शून्यावर बाद झाले नाहीत
२०१६ मध्येच टीएनएम अकादमीची सुरुवात
आराध्यच्या वडिलांनादेखील वाटायचं की, मुलांना चांगलं प्रशिक्षण मिळावं. त्यामुळे त्यांनी टीएनएम ट्रस्टसोबत गाजियाबाद डेव्हलपमेंट ऑथोरिटीकडून जमीन विकत घेतली. तिथे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. अकादमीत व्यायामशाळासुद्धा चांगल्या आहेत. अजय शर्मा यांच्या वाढदिवशी अकादमीला सुरुवात झाली. त्यामुळे आता बरीच मुलं रणजी खेळले आहेत. तसेच आराध्य आणि सिद्धार्थची तर १९ वर्षाखालील विश्वचषकासाठी भारतीय संघात झाली आहे.
सिद्धार्थला प्रशिक्षक आणि आराध्याच्या वडिलांनी केली मदत
अजय शर्मा म्हणाले सिद्धार्थचे वडील गाजियाबादमध्ये किराणा दुकान चालवतात. सिद्धार्थच्या वडिलांना क्रिकेटची खूप आवड आहे. सिद्धार्थ उजव्या हाताचा मधल्या फळीतला फलंदाज आहे. त्याच्यात कौशल्य असल्याने त्याला आराध्यचे वडील आणि प्रशिक्षक भरपूर मदत करतात.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत, पाकिस्तानसह ‘असे’ आहेत अंडर-१९ विश्वचषकासाठीचे सर्व संघ, वाचा एका क्लिकवर
महाराष्ट्रीयन फलंदाजाच्या जोरावर अमेरिकेने रचला इतिहास! आयर्लंडवर मिळवला ऐतिहासिक विजय
काय सांगता? विश्वविक्रमवीर एजाजची न्यूझीलंड संघातून गच्छंती; प्रशिक्षक म्हणतायेत…