Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘तू लढवय्या आहेस’, राहुल द्रविडची पंतसाठी प्रार्थना; कर्णधार पंड्यानेही केले मोठे भाष्य

'तू लढवय्या आहेस', राहुल द्रविडची पंतसाठी प्रार्थना; कर्णधार पंड्यानेही केले मोठे भाष्य

January 3, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rahul-Dravid-And-Hardik-Pandya

Photo Courtesy: Twitter/BCCI


मागील वर्षीच्या अखेरीस म्हणजेच 30 डिसेंबर रोजी रुडकी येथे भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा अपघात झाला होता. त्याची गाडी दुभाजकाला धडकल्याने मोठा अपघात घडला. रिषभच्या गाडीच्या मागे असलेल्या बस ड्रायव्हरने त्याला गाडीतून बाहेर काढत जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर त्याला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याची तब्तेत ठीक असल्याचे सांगितले जात आहे. अशात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांच्यासह संघातील इतर खेळाडूंनी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी पंत बरा होण्यासाठी प्रार्थना केली आहे. हा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) संघाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याने म्हटले आहे की, “हॅलो रिषभ. आशा आहे की, तू लवकरात लवकर ठीक होशील. माझे हे भाग्य आहे की, मी मागील एक वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये तुला काही चांगल्या खेळी खेळताना पाहिले आहे. तुझ्याकडे ती क्षमता आहे की, तू कठीण परिस्थितीतून बाहेर पडशील.”

💬 💬 You are a fighter. Get well soon 🤗 #TeamIndia wish @RishabhPant17 a speedy recovery 👍 👍 pic.twitter.com/oVgp7TliUY

— BCCI (@BCCI) January 3, 2023

हार्दिक पंड्या म्हणाला…
श्रीलंके संघाविरुद्ध भारताचा टी20 संघाचा कर्णधार बनलेल्या हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने म्हटले की, “रिषभ तू लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी मी प्रार्थना करतो. मला माहिती आहे की, तू एक लढवय्या आहेस आणि लवकर बरा होऊन पुनरागमन करशील. संपूर्ण संघ आणि संपूर्ण देश तुझ्यासोबत उभा आहे.”

‘लवकर बरा हो पंत’
सूर्यकुमार यादव म्हणाला की, “रिषभ तू लवकरात लवकर बरा व्हावा ही माझी इच्छा आहे. मात्र, मला माहिती आहे की, आता परिस्थिती कशी आहे. आम्ही तुला इथे मिस करत आहोत आणि भावा तू काळजी घे.” युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) म्हणाला की, “लवकर बरा हो भावा. एकसोबत चौकार आणि षटकार मारूया.”

याव्यतिरिक्त ईशान किशन आणि शुबमन गिल यांनीही रिषभला लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली आहे. (coach rahul dravid and hardik pandya on rishabh pant recovery read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जावई बरा होईल, तुम्ही टेन्शन नका घेऊ’, उर्वशीच्या आईने पंतसाठी पोस्ट शेअर करताच युजर्सच्या कमेंट्स

“विराट-रोहितच्या भरवश्यावर राहू नका”, भारतीय दिग्गजाने संघ व्यवस्थापनाला सुनावले खडे बोल


Next Post
Photo Courtesy: Twitter/Blackcaps

हेन्री-एजाजने पाडल्या पाकच्या मर्यादा उघड्या! दहाव्या गड्यासाठी केली 'झुंजार' शतकी भागीदारी

Sryakumar Yadav

सूर्या श्रीलंकन फलंदाजांची करणार धुलाई! नेट्समध्ये खेळले एकापेक्षा एक शॉट्स

Pakistani Cricket Team

"आमची निवडसमिती आणि टीम मॅनेजमेंट थर्ड क्लास", पाकिस्तानी दिग्गज बरसला

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143