Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमित शहांना भेटला हार्दिक पंड्या आणि भाऊ कृणाल, सोशल मीडियावर फोटो चर्चेत

अमित शहांना भेटला हार्दिक पंड्या आणि भाऊ कृणाल, सोशल मीडियावर फोटो चर्चेत

December 31, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
hardik pandya Krunal pandya Amit Shah

Photo Courtesy: Twitter/hardikpandya7


हार्दिक पंड्या सध्या भारतीय क्रिकेट संघातील सर्वात महत्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये हार्दिकचा फॉर्म जबरदस्त राहिला असून बीसीसीआयने याची देखल देखील घेतली आहे. जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक भारतीय संघाच्या कर्णधाराच्या रुपात चाहत्यांना पाहायला मिळेल. तत्पूर्वी भारताचे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी पंड्या बंधूंना घरी भेटण्यासाठी बोलवले होते.

हार्दिकने शनिवारी (31 डिसेंबर) स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून याविषयी सर्वांना माहिती दिली. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने केंद्रिय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबतचे दोन फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हार्दिक पंड्याच्या भाऊ कृणाल पंड्या (Krunal Pandya) सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. कृणाल देखील गृहमंत्र्यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी पोहोचला होता. हार्दिकने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “माननीय गृहमंत्री अमित शहांसोबत अमूल्य वेळ घालवण्यासाठी आणि आम्हाला आमंत्रित करण्यासाठी त्यांचे आभार. तुम्हाला भेटणे ही सन्मान आणि भाग्याची गोष्ट होती.”

Thank you for inviting us to spend invaluable time with you Honourable Home Minister Shri @AmitShah Ji. It was an honour and privilege to meet you. 😊 pic.twitter.com/KbDwF1gY5k

— hardik pandya (@hardikpandya7) December 31, 2022

दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि वनडे मालिका जानेवारी महिन्यात खेळली जाणार आहे. उभय संघांतील तीन सामन्यांची टी-20 मालिका 3 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. भविष्यात देखील नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या ऐवजी हार्दिकलाच टी-20 संघाचा कर्णधार बनवले जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. दुसरीकडे वनडे फॉरमॅटमध्ये देखील त्याला उपकर्णधारपद मिळाले आहे. श्रीलंकेविरुद्ध 10 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या वनडे मालिकेत रोहित संघाचे नेतृत्व करणार असून उपकर्णधाराची भूमिका हार्दिकला पार पाडायची आहे.

संघाचा नियमित कर्णधार केएल राहुल या दोन्ही मालिकांमध्ये खेळणार नाहीये. राहुल आणि बॉलिवुड अभिनेत्री अथिया शेट्टी या मालिकेवेळी लग्नबंधनात अडणार असल्याच्या बातम्याही मागच्या मोठ्या काळापासून समोर येत आहेत.  श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळणार नसल्याचे सांगितले जात आहे. ही दुखापत रोहितला बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत झाली होती. अशात हार्दिकला संघाचा कर्णधार, तर सूर्यकुमारला पहिल्यांदाच टी-20 संघाचा उपकर्णधार बनवले गेले आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘या’ गोलंदाजांनी गाजवली 2022मध्ये कसोटी, सर्वाधिक विकेट ‘या’ गोलंदाजाच्या नावावर
2022 मधील ‘या’ पाच पार्टनरशिप्स नाही विसरू शकणार चाहते! यादीत विराट, वॉर्नरसारख्या दिग्गजांचा समावेश


Next Post
Photo Courtesy: bcci.tv

रिषभ पंतच्या अपघाताला नवीन वळण! डीडीसीएला स्वतः सांगितला घडला प्रकार

michael bevan

1 जानेवारी ही तारीख क्रिकेटविश्वात फक्त मायकल बेवनच्या 'त्या' खेळीसाठी ओळखली जाते

Photo Courtesy: Twitter/BCCI

INDvSL: एक सलामीवीर तर आधीच बाहेर! श्रीलंकेविरुद्ध कोण येणार ओपनिंगला? 'या' 3 खेळाडूंमध्ये स्पर्धा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143