Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रिषभ पंतच्या अपघाताला नवीन वळण! डीडीसीएला स्वतः सांगितला घडला प्रकार

रिषभ पंतच्या अपघाताला नवीन वळण! डीडीसीएला स्वतः सांगितला घडला प्रकार

December 31, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: bcci.tv

Photo Courtesy: bcci.tv


भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. शुक्रवारी (30 डिसेंबर) पहाटे 5.30च्या सुमारास त्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये पंतला गंभीर दुखापत झाली. क्रिकेटविश्वासाठी पंतचा अपघात ही, धक्कादायक बातमी आहे. गाडीचा अपघात नेमका कसा झाला, हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात चाहत्यांसह सर्वच आहेत. पण आता अपघाताचे कारण समोर येताना दिसत आहे.

दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन (DDCA) म्हणजे डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा (Sham Sharma) यांनी रुग्णालयात जाऊन रिषभ पंत () याची भेट घेतली. पंतला भेटल्यानंतर शर्मा यांनी त्याच्या तब्येतीविषयी महत्वाची महिती दिली. माध्यमांशी बोलताना शर्मा म्हणाले की, “रिषभ पंतची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि वेगाने सुधारणा देखील होत आहे. बीसीसीआयचे डॉक्टर्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपर्कात आहेत. जय शहा देखील यावर लक्ष ठेवून आहेत. सध्या तरी पंतला याच रुग्णालयात ठेवले जाणार आहे. पंतने मला सांगितेल की, गाडी खड्ड्यात जाऊ नये यासाठी प्रयत्न करत होते आणि तितक्यात अपघात घडला.” दरम्यान, शर्मांच्या या एका प्रतिक्रियेमुळे अनेक चाहत्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.

दरम्यान, पंतच्या दुखापतीची पाहणी केल्यानंतर तज्ञ डॉक्टरांनी त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी मोठा काळ लागणार, असे सांगितले आहे. पंतच्या पाठीला, घोट्याला आणि गुडघ्यांना दुखापत झाली आहे. त्याच्या एका पायाचे लिगामेंट दुखापले गेल्यामुळे पुढचे 9 महिने त्याला क्रिकेट केळता येणार नसल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे. पंतला पूर्णपणे फिट होण्यासाठी 9 महिने ते एक वर्षाचा काळ लागू शकतो. अशात पंत आयपीएल 2023 आणि वनडे विश्वचषकाला मुकण्याची शक्यता आहे. आगामी विश्वचषक भारतात खेळला जाणार असून पंत यात महत्वाची भूमिका पार पाडू शकत होता. पण आता विश्वचषकात त्याच्या खेळण्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘या’ गोलंदाजांनी गाजवली 2022मध्ये कसोटी, सर्वाधिक विकेट ‘या’ गोलंदाजाच्या नावावर
2022 मधील ‘या’ पाच पार्टनरशिप्स नाही विसरू शकणार चाहते! यादीत विराट, वॉर्नरसारख्या दिग्गजांचा समावेश


Next Post
michael bevan

1 जानेवारी ही तारीख क्रिकेटविश्वात फक्त मायकल बेवनच्या 'त्या' खेळीसाठी ओळखली जाते

Photo Courtesy: Twitter/BCCI

INDvSL: एक सलामीवीर तर आधीच बाहेर! श्रीलंकेविरुद्ध कोण येणार ओपनिंगला? 'या' 3 खेळाडूंमध्ये स्पर्धा

Photo Courtesy: Twitter/@TheRealPCB

रमीझ राजा काय डोक्यावर पडलेत? पाकिस्तानच्या माजी कर्णधारानेच डागले टीकास्त्र

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143