जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध ऍजबस्टन येथे झालेला पाचवा कसोटी सामना ७ विकेट्सने गमावला. या सामन्यातील पहिल्या ३ दिवशी भारतीय संघाचे सामन्यावर वर्चस्व होते. मात्र शेवटच्या २ दिवसांत सामना भारतीय संघाच्या हातून निसटला. भारतीय संघाच्या या पराभवानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारतीय संघ कुठे चुकला आणि कोणत्या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे, याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
सामना संपल्यानंतर द्रविड यांनी पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान त्यांना भारतीय खेळाडूंनी कुठे चुका केल्या, याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, “चौथ्या दिवशी आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. फलंदाजीतील फ्लॉप शोनंतर आमच्या गोलंदाजीतही दम नव्हता. याउलट इंग्लंडच्या खेळाडूंनी मात्र चांगली फलंदाजी केली. त्यांच्या शानदार फलंदाजीला श्रेय देणे गरजेचे आहे.”
भारतीय संघाने इंग्लंडला शेवटच्या डावात विजयासाठी ३७८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करणे इंग्लंडसाठी नक्कीच सोपे नव्हते. परंतु भारतीय गोलंदाजांच्या हाराकिरीमुळे आणि क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे भारतीय संघ इंग्लंडच्या फलंदाजांना रोखू शकला नाहीत. अगदी अशीच परिस्थिती दक्षिण आफ्रिकेविरुद्धही पाहायला मिळाली होती.
याबद्दल बोलताना द्रविड म्हणाले की, “दक्षिण आफ्रिका आणि येथे आमचे शेवटच्या डावांमधील प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. यामागे नानाविध कारणे असू शकतात. खेळाडूंना त्यांच्या फिटनेसची पातळी बनवून ठेवावी लागेल. आमची फलंदाजीही जास्त विशेष राहिली नाही. परंतु आम्ही प्रत्येक सामन्यानंतर नवीन गोष्ट शिकत जातो. आम्ही तिसऱ्या डावात खराब फलंदाजी आणि चौथ्या डावात खराब गोलंदाजी का करत आहोत, याबद्दल नक्की विचार करू.”
तसेच द्रविड यांना आगामी कसोटी मालिकांबद्दल काय विचार करत आहात, असे विचारले असता, ते म्हणाले की, “ज्याप्रकारे सध्या क्रिकेट चालू आहे. त्यानुसार सध्या याबद्दल विचार करण्यासाठी वेळच नाही. हाच प्रश्न मला दोन दिवसांंनंतर विचारल्यास त्यावर माझे वेगळे उत्तर असेल.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाचव्या कसोटीनंतर पहिल्या टी२० सामन्यालाही मुकणार रोहित शर्मा? समोर आली मोठी अपडेट
इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियानेही आखली भारताला पराभूत करण्याची व्यूहरचना
मजबूत स्थितीत असतानाही टीम इंडियाच्या हाती पराभव, चूक सांगत शास्त्रींची खेळाडूंना फटकार