---Advertisement---

चाहरचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर द्रविडने डगआऊटमधून दिला ‘सिक्रेट मॅसेज’ अन् भारताने मालिका खिशात घातली

On: बुधवार, जुलै 21, 2021 8:40 AM
---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात मंगळवार रोजी (२० जुलै) कोलंबोच्या मैदानावर पार पडलेला दुसरा वनडे सामना धाकधूक वाढवणारा ठरला. श्रीलंकेच्या २ फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत ५० षटकअखेर संघाच्या २७५ धावा फलकावर नोंदवल्या. श्रीलंकेच्या या २७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. सूर्यकुमार यादवला वगळता एकही फलंदाज ५० धावांचा आकडाही गाठू शकला नाही.

मात्र खालच्या फळीत दिपक चाहर याने शेवटपर्यंत नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला विजय साजरा केला. त्याच्या या विक्रमतोड खेळीमागे संघ प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा हात होता. स्वत: मॅच विनर चाहरने यासंदर्भात खुलासा केला आहे.

चाहरने आक्रमक फटकेबाजी करत ४५ व्या षटकापर्यंत आपले अर्धशतक पूर्ण केले. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये बसलेला द्रविड डगआउटमध्ये पळत आला आणि चाहरच्या अर्धशतकी खेळीची टाळ्यांच्या कडकडाट स्तुती केली.

https://twitter.com/man4_cricket/status/1417537612277981184?s=20

https://twitter.com/CSKFansArmy/status/1417543200479215619?s=20

दरम्यान चाहर आता अर्धशतक पूर्ण केल्यानंतर मोठमोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद होईल, याचा अंदाजा द्रविडला आला. त्यामुळे त्याने पटकन चाहरचा भाऊ राहुल चाहरला आपल्याजवळ बोलावून घेतले. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या फोटोत दिसून येते की, द्रविड राहुलला काही तरी समजावून सांगत आहे. मुळात द्रविडने त्यावेळी राहुलला दिपक चाहरसाठी काही तरी संदेश दिला आणि जाऊन आपल्या मोठ्या भावापर्यंत तो संदेश पोहोचवण्यास सांगितले.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1417537541692035072?s=20

https://twitter.com/man4_cricket/status/1417537967661457409?s=20

दिपक चाहरने सामन्यानंतर या संदेशाबद्दल उलगडा केला आहे. तो म्हणाला की, “द्रविड सरांनी मला सल्ला दिला होता की, मी प्रत्येक चेंडू खेळला पाहिजे. एकही चेंडू विना धावेचा वाया जाता कामा नये. त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास होता. खरे तर त्यांनी नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवला आहे. जेव्हा द्रविड सर भारतीय अ संघाचे प्रशिक्षक होते, तेव्हा मी त्यांच्या प्रशिक्षणाखाली खेळलो आहे. तिथेही मी फलंदाजी काही प्रशंसनीय खेळी केल्या आहेत.”

“श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यावेळी द्रविड सरांनी मला म्हटले होते की, मी सातव्या क्रमांकावरही फलंदाजी करू शकतो. जेव्हा आम्हाला विजयासाठी फक्त ५० धावांची आवश्यकता होती, तेव्हा मला वाटले की आम्ही आता हा सामना जिंकू शकतो. त्यासाठी मी जोखीम घेत काही फटकेही मारले,” असेही तो पुढे म्हणाला.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात चाहरला सातव्या क्रमांकावर नाही पण त्यापुढील आठव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत चाहरने वनडे कारकिर्दीतील पहिलेवहिले अर्धशतक झळकावले. ८२ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने नाबाद ६९ धावा केल्या. याबरोबरच संघ सहकारी भुवनेश्वर कुमारसोबत नाबाद ८६ धावांची भागिदारीही केली आणि संघाला ४९.१ षटकात संघाला सामन्यासह मालिकाही जिंकून दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

राडा! टीम इंडियाकडून पराभूत झाल्यानंतर श्रीलंकेच्या कोच-कर्णधाराचा पीचवर राडा, अगदी…

शाबासकी तर द्यायलाच हवी! कोलंबोत धवनच्या टीम इंडियाने मिळवलेल्या विजयाचे सातासमुद्रापारहून विराटकडून कौतुक

इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले, कर्णधार-उपकर्णधार झाले जखमी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---