आयपीएल २०२२ नंतर भारतीय क्रिकेटपटू आता येत्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेच्या तयारीत मग्न आहेत. ९ जूनपासून उभय संघातील ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू होत असून १९ जून रोजी मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाईल. आगामी टी२० विश्वचषक २०२२च्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची असणार आहे.
या मालिकेतून ३७ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) ३ वर्षांनंतर टी२० संघात पुनरागमन (Dinesh Karthik Comeback) करेल. तत्पूर्वी भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी कार्तिकची संघातील भूमिका काय आहे? (Dinesh Karthik Role) याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघात काय असेल कार्तिकची भूमिका?
कार्तिकने आयपीएल २०२२मध्ये दमदार प्रदर्शन करत भारतीय संघातील आपली जागा परत मिळवली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रतिनिधित्व करताना फिनिशरची भूमिका निभावली होती. त्याने बेंगलोरकडून आयपीएलच्या पंधराव्या हंगामात १६ सामने खेळताना ५५च्या सरासरीने ३३० धावा चोपल्या आहेत. त्याच्या बऱ्याच विस्फोटक खेळींमुळे बेंगलोरला अनपेक्षित विजय मिळाले आहेत.
आता हीच भूमिका कार्तिक भारतीय संघासाठी निभावेल. कार्तिकबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना द्रविड (Coach Dravid On Dinesh Karthik Role) म्हणाले की, “हे जगजाहीर आहे. त्याने त्याच्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याने कठिण परिस्थितीत असताना आणि एका वेगळ्याच टप्प्यावर असताना शानदार खेळ दाखवला आहे. त्याने गेल्या २-३ वर्षात सातत्याने शानदार खेळ खेळला आहे.”
“तो ज्या कोणत्या संघाकडून खेळला आहे, त्या संघाकडून सामन्याचा कायापालट करण्याची त्याच्यातील क्षमता त्याने दाखवून दिली आहे. यासाठीच त्याला भारतीय संघात निवडले गेले आहे. कार्तिकची भूमिका स्पष्ट आहे. त्याने जसे आयपीएलमध्ये केले आहे, तसेच तो भारतीय संघासाठीही सामना फिनिशरची भूमिका निभावेल,” असेही द्रविडने म्हटले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
इंस्टाग्रामचा कोहलीच ‘किंग’! विराटने पूर्ण केले खास द्विशतक, बनला जगातील एकमेव क्रिकेटर
विश्वचषकातील सरासरी प्रदर्शनानंतरही भारतीय क्रिकेटर टॉप-१०मध्ये कायम, स्म्रीती ‘या’ स्थानी कायम
अरेरे! आझमच्या पाकिस्तान संघावर ओढावू शकते वनडे विश्वचषक न खेळताच बाहेर होण्याची नामुष्की