भारतीय संघाने बांगलादेश संघाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यात पराभव पत्करला होता. त्यामुळे तिसऱ्या वनडेत भारताने विजय मिळवणे महत्त्वाचे होते. नाहीतर बांगलादेश संघाने भारताला व्हाईटवॉश दिला असता. मात्र, या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज ईशान किशन याने अशी काही कामगिरी केली, ज्याची कुणालाही अपेक्षा नव्हती. त्याच्या या कामगिरीमुळे भारतासाठी विजय मिळवणे सहजशक्य झाले. किशनने यादरम्यान द्विशतकी खेळी केली. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे तो आता भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य बनण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. विशेष म्हणजे, जेव्हा त्याने द्विशतक ठोकले, तेव्हा विराट कोहली भांगडा करताना दिसला, तर दुसरीकडे प्रशिक्षक राहुल द्रविड जल्लोष करताना दिसले. द्रविड यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
राहुल द्रविड व्हिडिओ
ईशान किशन (Ishan Kishan) याने तिसऱ्या वनडेत 131 चेंडूत 210 धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान त्याने 10 षटकार आणि 24 चौकारांचा पाऊस पाडला. किशन वनडेत सर्वात वेगवान द्विशतक ठोकणारा फलंदाज बनला. झाले असे की, किशनने जसे द्विशतक झळकावले, तसे मैदानाच्या बालकनीमध्ये असणाऱ्या राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी एकच जल्लोष केला. त्यांनी दोन्ही हात वर करत ईशानच्या द्विशतकाचा जल्लोष साजरा केला. सोशल मीडियावर राहुल द्रविड यांच्या जल्लोषाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. कुणालाच विश्वास बसत नाहीये की, द्रविड अशाप्रकारे गर्जना करत जल्लोषही करू शकतात.
खरं तर, अलीकडच्या काळात द्रविड प्रशिक्षक म्हणून अपयशी ठरताना दिसत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ टी20 विश्वचषक स्पर्धेत आणि आशिया चषकात अपयशी ठरला. माध्यमांमध्ये असेही म्हटले जात आहे की, द्रविड यांना टी20 संघाच्या प्रशिक्षक पदावरून हटवले जाऊ शकते.
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1601513007909326848?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1601513007909326848%7Ctwgr%5E76fddf40e8ca37163328694ad792c0cfc9a4ab7a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fwatch-video-rahul-dravid-roars-in-celebration-after-ishan-kishan-completes-200-vs-bangladesh-in-3rd-odi-hindi-3596685
सामन्याचा आढावा
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 409 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाचा डाव 182 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना 227 धावांनी आपल्या खिशात घातला. ईशानला त्याच्या वादळी द्विशतकासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने विराट कोहली याच्यासोबत 290 धावांची भागीदारी रचल्यामुळे भारतीय संघाला 400 धावांचा आकडा पार करण्यात यश आले होते. (coach rahul dravid roars in celebration after ishan kishan completes 200 vs bangladesh in 3rd odi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्याच्या विक्रमाची केली बरोबरी, त्याच्याकडूनच मिळाली दाद; मॅक्युलमसमोर स्टोक्सचा नाद खुळा पराक्रम
‘आता 200 धावा केल्या आहेत…’, विश्वचषकातील निवडीच्या प्रश्नावर ईशानचे मोठे वक्तव्य