भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंड डे कसोटी सामन्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जाणार जाणार आहे. मंगळवारी (26 डिसेंबर) हा सामना सुरू होण्याआधी भारताने भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. द्रविडने केएल राहुल या सामन्यात यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसणार, हे स्पष्ट केले.
ईशान किशन या कसोटी मालिकते भारतासाठी यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडणार होता. मात्र, ईशानने संघ व्यवस्थापनाकडे मानसिक तणावाचे कारण देत या मालिकेतून विश्रांती घेतली. केएस भरत त्याच्या बदली खेळाडूच्या रुपात संघात सामील जाला आहे. मात्र, भरतला पहिल्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच दिसते. केएल राहुल () पहिल्या सामन्यात यष्टीरक्षक म्हणून खेळेल, हे स्वतः राहुल द्रविड () यांनीच स्पष्ट केले.
माध्यमांशी चर्चा करताना द्रविड म्हणाले, “मी याकडे एक रोमांचक आव्हान (राहुलसाठी) म्हणून पाहत आहे. नक्कीच काहीतरी नवीन करण्याची ही त्याच्यासाठी एक संधी आहे. ईशान किशनही उपलब्ध नाहीये. त्यामुळेच राहुलला ही संधी मिळणार आहे. आणच्याकडे निवडण्यासाठी काही यष्टीरक्षक होते. राहुल त्यापैकीच एक आहे. त्याच्यासोबत चर्चा झाली होती. राहुल यष्टीरक्षक म्हणून खेळण्यासाठी इच्छुक दिसत आहे.”
“राहुलला कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून खेळण्याचा अनुभव नाहीये. आम्हीही याच्याशी सहमत आहोत. पण वनडे क्रिकेटमध्ये आम्ही राहुल नियमितपणे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळत आला आहे. मागच्या पाच-सहा महिन्यांमध्ये त्याची चांगली तयारी झाली आहे,” असे राहुल यावेळी म्हणाला. दरम्यान, बॉक्सिंग डे कसोटी संपल्यानंतर उभय संघांतील दुसरा कसोटी सामना 3 ते 7 जानेवारी यादरम्यान खेळला जाईल. सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड यानेही दुखापतीच्या कारणास्तव या मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी अभिमन्यू ईश्वरन याला संघात सामील केले गेले आहे. (Coach Rahul Dravid’s message for KL Rahul, who is playing as a wicketkeeper in Tests against South Africa )
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (सी), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह vc), प्रसिध कृष्णा, केएस भरत (wk)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक –
26 ते 30 डिसेंबर 2023 – पहिला कसोटी सामना, सुपर स्पोर्ट्स पार्क, सेंचुरियन
03 ते 07 जानेवारी 2024 – दुसरा कसोटी सामना, न्यूळँड्स, कॅप टाऊन
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंडला टी-20 वर्ल्डकप जिंकवून देणार कायरन पोलार्ड! कॅरेबियन दिग्गजाच्या खांद्यावर नवी जबाबदारी
22व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत साई एफसी, दुर्गा एफसी संघांची विजयी सलामी