---Advertisement---

दुखापतीतून बरा झालेला हा भारतीय खेळाडू कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज…

On: शुक्रवार, फेब्रुवारी 28, 2020 7:30 PM
---Advertisement---

उद्या (29 फेब्रुवारी) ख्राईस्टचर्च (Christchurch) येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात दुसरा आणि शेवटचा कसोटी (2nd Test Match) सामना सुरु होणार आहे.

या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा भाग होऊ शकतो, अशी माहिती भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी शुक्रवारी (28 फेब्रुवारी) दिली.

शॉबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले की, शॉ पायाच्या दुखापतीतून बरा झाला आहे.

शॉच्या डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला गुरुवारी (26 फेब्रुवारी) संघाबरोबर सराव करता आला नव्हता. शॉच्या या दुखापतीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली होती. मात्र, आता शुक्रवारी शॉ नेट्समध्ये सराव करताना दिसला.

शास्त्री शॉवर लक्ष देत होते. यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) त्याला काही सल्ले दिले होते. शास्त्री शॉच्या फीटनेसबद्दल सर्व शंकांना दूर ठेवत म्हणाले की, “शॉ दुसऱ्या कसोटीसाठी तयार आहे.”

दुसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत शॉ ठीक झाला नसता, तर त्याच्याऐवजी सलामीवीर फलंदाज शुभमन गिलला (Shubman Gill) संधी देण्याची शक्यता वर्तविली जात होती.

शॉने पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात अनुक्रमे 16 आणि 14 धावांची खेळी केली होती.

वेलिंग्टन येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताला 10 विकेट्सने पराभूत केले होते. आता भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. तर न्यूझीलंडचा भारताला व्हाईटवॉश देण्याचा प्रयत्न असेल.

https://twitter.com/Maha_Sports/status/1233333900115619845

https://twitter.com/Maha_Sports/status/1233284866550173697

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---