जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेवर आहे. या स्पर्धेत आतापर्यंत प्रत्येक संघाने किमान चार ते पाच सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये 10 पैकी एक संघ वगळता इतर 9 संघांनी किमान एक किंवा अधिक सामने जिंकले आहेत. मात्र, एक संघ असा आहे, ज्याला पाचपैकी एकही सामना जिंकता आला नाही. तो संघ म्हणजेच दिल्ली कॅपिटल्स संघ होय. दिल्लीने सुरुवातीचे पाचही सामने गमावले आहेत. सलग पाच सामन्यांतील पराभवानंतर दिल्ली गुणतालिकेत शून्य गुणांसह दहाव्या स्थानी आहे. रिषभ पंत संघात नसल्यामुळे संघाची धुरा डेविड वॉर्नर याच्याकडे आहे. मात्र, त्याला संघाकडून विजयी कामगिरी करवून घेण्यास अडचण येत आहे.
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला या हंगामातील शेवटचा पराभव रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून मिळाला होता. तसेच, फाफ डू प्लेसिस याच्या संघाने डेविड वॉर्नर (David Warner) याच्या संघाला 23 धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात दिल्लीने शानदार कामगिरी केली होती, पण संघाची फलंदाजी खूपच ढासळली. त्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. संघाला मिळालेल्या सलग पाच पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) यांनी संघाचा आत्मविश्वास वाढवला आणि सर्वांची प्रशंसा केली.
Back each other, play hard and believe in the process 🙌
📽| Our Head Coach Ricky Ponting and Director of Cricket Sourav Ganguly had some inspirational words for the boys after #RCBvDC 💪#YehHaiNayiDilli #IPL2023 @RickyPonting @SGanguly99 pic.twitter.com/GV0ZNyFXOP
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 16, 2023
रिकी पाँटिंग म्हणाला की, “आम्ही आरसीबीविरुद्ध चांगली गोलंदाजी केली, पण त्यांनी आम्हाला आव्हान दिले आणि पुढे गेले. असे असले, तरीही आपण आपली प्रतिबद्धता परत मिळवली. कुलदीप तू कुठे आहेस मित्रा, तू मला सामन्यानंतर माफी मागितली. खेळाच्या मैदानावर जे काही होते, त्यासाठी मला किंवा इतर कुणाचीही माफी मागण्याची गरज नाही. तू मजबूतीने पुनरागमन करावे अशी माझी इच्छा आहे.”
यानंतर त्याने ललित यादव, अक्षर पटेल आणि मिचेल मार्श यांच्या गोलंदाजीची प्रशंसा केली. तसेच, तो म्हणाला की, सर्वांनी चांगली कामगिरी केली. दुसरीकडे, संघाचा क्रिकेट संचालक सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाला की, “आपण अजूनही पुनरागमन करू शकतो आणि पुढील 9 सामने जिंकू शकतो.”
गांगुलीनेही वक्तव्य करत संघाचा आत्मविश्वास वाढवला. दिल्लीचा पुढील सामना 20 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना अरुण जेटली स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यातून दिल्ली विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. (coach ricky ponting to kuldeep yadav do not ever say sorry to me after dc lost 5th match in a row)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विन बाद झाल्यानंतर ढसाढसा रडली त्याची मुलगी, आईने सावरण्याचा प्रयत्नही केला पण…, व्हिडिओ व्हायरल
‘धोनीसारखा कर्णधार ना कधी झालाय, आणि भविष्यातही…’, भारताच्या माजी दिग्गजाने बांधले कौतुकाचे पूल