---Advertisement---

का झाला होता २०११च्या विश्वचषक अंतिम सामन्यात दोन वेळा टाॅस?

---Advertisement---

बरोबर आज ७ वर्षे झाले. भारतीय संघाने तब्बल २८ वर्षांनी आयसीसीचा ५० षटकांचा विश्वचषक जिंकला होता. ३० वर्षीय एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा कारणामा केला होता. 

या सामन्यात एक गोष्ट अशी घडली होती की ज्यामुळे श्रीलंका संघाचा तेव्हाचा कर्णधार कुमार संगकारा हा भारतीयांसाठी व्हीलन ठरला होता. या घटनेमुळे संगकाराच्या कारकिर्दीवर एक डाग नक्की लागला होता. 

जेव्हा या दिवस रात्र झालेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक केली होती तर संगकाराने हेड असे बोलल्याचे त्याचे म्हणणे होते. 

या सामन्यात भारतीय कर्णधार एमएस धोनी आणि श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारा हे सामनाधिकारी जेफ क्राॅउनबरोबर नाणेफेकीला आले होते. तेव्हा समालोचक म्हणून सध्याच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शात्री जबाबदारी पार पाडत होते. 

जेव्हा पहिल्यांदा नाणेफेक झाली तेव्हा कुमार संगकारा हा अतिशय हळू आवाजात हेड किंना टेल यापैकी काहीतरी बोलला होता. यामुळे धोनीला तो टेल असे बोलला असे वाटले तर संगकाराचे म्हणणे होते की तो हेड असे बोलला.  त्यामुळे धोनी लगेच शात्री यांच्या जवळ जावून ‘वी वील बॅट फस्ट’ असे म्हणाला होता. 

परंतू सामनाधिकारी जेफ क्राॅउन तसेच समालोचक रवी शात्री यांना संगकारा काय बोलला हे ऐकूच गेले नव्हते. जेव्हा शास्री यांनी सामनाधिकारी जेफ क्राॅउन यांच्याकडे पाहीले तेव्हा त्यांनी आपण संगकारा काय म्हटला हे ऐकलेच नसल्याचे सांगितले. 

शास्त्री यांच्या मते पहिल्यांदा नाणेफेक झाली तेव्हा नाणे हे हेड बाजूने पडले होते परंतू संगकारा काय म्हणाला हे त्यांना ऐकू आले नव्हते. 

त्यामुळे बरीच चर्चा झाली आणि अखेर नाणेफेक पुन्हा करण्याचा निर्णय झाला.  यावेळी संगकारा हेड असे बोलला आणि त्याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 

https://twitter.com/GheePongal/status/54172965713092608

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment