अॅडलेड। भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया संघात अॅडलेड ओव्हल मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आज चौथ्या दिवशी (9 डिसेंबर) आॅस्ट्रेलियाचा संघ मैदानात हाताच्या दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे.
आॅस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज कॉलीन गेस्ट यांचे शनिवारी(8 डिसेंबर) निधन झाले आहे. त्यांचे 81 वय होते. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आॅस्ट्रेलियाचा संघाने सामन्याच्या चौथ्या दिवशी हाताला काळी पट्टी बांधली आहे.
The Australian players are wearing black armbands today in memory of Colin Guest (Baggy Green No.222) who sadly passed away yesterday #AUSvIND
— cricket.com.au (@cricketcomau) December 8, 2018
गेस्ट यांनी 1963 ला जानेवारीमध्ये इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. हा एकमेव सामना ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले. त्यांना या सामन्यात एकही विकेट घेता आली नव्हती. पण त्यांची देशांतर्गत क्रिकेटमध्ये यशस्वी कारकिर्द आहे. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळताना 36 सामन्यात 115 विकेट्स घेतल्या आहेत.
व्हिक्टोरिमध्ये जन्म झालेल्या गेस्ट यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक क्रिकेटही व्हिक्टोरियासाठी खेळले आहे. पण ते त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा मोसम 1966-67 मध्ये वेस्टर्न आॅस्ट्रेलिया कडून खेळले. त्यांनी वेस्टर्न आॅस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.
क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट म्हणाले, ‘गेस्ट यांचे खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून महत्त्वाचे योगदान राहिले आहे.’
तसेच ते पुढे म्हणाले, “क्रिकेट आॅस्ट्रेलिया बोर्ड आणि स्टाफ वतीने मी गेस्ट यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांची कमी भासेल. आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या, मैत्रपरिवाराच्या बरोबर आहोत.’
We are saddened today by the passing of Colin Guest, former MCC, Victorian and Australian cricketer. His career is outlined here, in an excerpt from an MCC Library book on MCC Test players.
RIP, Colin. pic.twitter.com/SOgDtTIJwy— Melbourne Cricket Club (@MCC_Members) December 9, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–हा आॅस्ट्रेलियन गोलंदाज पडतोय भारतीय फलंदाजांना भारी
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: आर अश्विनने १२ षटकांच्या आतच आॅस्ट्रेलियाला दिला पहिला धक्का
–हॉकी विश्वचषक २०१८: भारताचा कॅनडावर विजयी पंच, उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश