न्यूझीलंड संघात अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले आहेत. काही खेळाडूंच्या नावे अनेक मोठमोठ्या विक्रमांची नोंद आहे. तसेच असाही एक फलंदाज आहे ज्याने अवघ्या १४ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले होते. तसेच टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३-३ शतकांची नोंद आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून कॉलिन मुन्रो आहे. नुकताच त्याने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे.
न्यूझीलंड संघाचा सलामीवीर फलंदाज कॉलिन मुन्रो याने अनेकदा न्युझीलंड संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतोय. त्याने एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “जेव्हा माझी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघात निवड झाली नव्हती, तेव्हा मी खूप दुखी होतो. मला संघात स्थान न देण्यामागचे कारण देखील सांगण्यात आले नव्हते. मला तर असं वाटतंय हा शेवट आहे.”
तर या कारणामुळे नाही मिळाले न्यूझीलंड संघात स्थान
मुन्रोने याबाबत खुलासा करत म्हटले की, “गेल्या वर्षी मी मायदेशात होणारी मालिका सोडून, बिग बॅश लीग स्पर्धेत पर्थ स्कॉरचर्स संघाचे प्रतिनिधित्व करत होतो. त्यामुळे मला न्यूझीलंड संघात स्थान देण्यात आले नाही.” त्याचे म्हणणे असे आहे की, ऍडम मिल्नेने देखील बिग बॅश लीग स्पर्धेत सहभाग घेतला होता. इतकेच नव्हे तर त्याने करार देखील मोडला होता. तरीदेखील त्याला न्यूझीलंड संघात स्थान देण्यात आले.
मुलांचा सांभाळ करण्यासाठी पैशांची गरज
तसेच मुन्रो पुढे म्हणाला की, “मी बिग बॅश लीग स्पर्धा खेळण्याचा निर्णय यामुळे घेतला होता. कारण, मला दोन मुलं आहेत. त्यांचा सांभाळ करण्यासाठी मला पैशांची गरज आहे.
अशी आहे कारकीर्द
कॉलिन मुन्रोच्या टी२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण ६५ टी२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला १७२४ धावा करण्यात यश आले आहे. तर ५७ डावात त्याने ८ अर्धशतकांच्या साहाय्याने त्याने १२७१ धावा केल्या आहेत.