fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

दिग्गज खेळाडूने माॅडेलला घरी बोलवून केला रेप, स्वत: होता कोरोना बाधीत

Collum Hudson Arrested In Rape Accusation Afrom London Recovered From Corona Virus

नवी दिल्ली । लंडनमध्ये राहणारा चेल्सीचा १९ वर्षीय फुटबॉलपटू कॅलम हडसन इंग्लिश प्रीमियर लीगपूर्वी कोरोना व्हायरसमुळे बाधित होणारा पहिला खेळाडू होता. यानंतर तो क्वारंटाईन झाला होता. असे असले तरीही त्याला गंभीर आरोपांमुळे अटक करण्यात आले आहे.

काही दिवसांमध्ये क्लबचे ट्रेनिंग सेशन सुरु होणार होते. तरी आता हडसन (Callum Hudson) याचा भाग होता येणार नाही. चेल्सीच्या (Chelsea) या खेळाडूवर पोलीसांनी बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे.

पोलीसांनी हडसनला अटक करत मुलीला पाठवले रुग्णालयात-

माध्यमांतील काही वृत्तानुसार पोलिसांना एका मुलीने हडसनच्या घराचा पत्ता देत मदतीसाठी बोलावले होते. याबरोबरच तिने डॉक्टरांनाही बोलावले होते. असे म्हटले जात आहे की, त्याने सोशल मीडियावर त्या मुलीशी संपर्क साधला होता. तसेच त्या मुलीला आपल्या पेंटहाऊसवर बोलावले होते. त्याने मुलीला आणण्यासाठी आपली गाडी पाठविली होती. पोलीसांनी प्रसंगावेळी पोहोचत त्याला अटक केले आणि मुलीची तब्येत खराब झाल्याच्या तक्रारीनंतर तिला रुग्णालयात पाठवले.

पोलीसांनी सांगितले की, रविवारी (१७ मे) सकाळी त्या मुलीने पोलीसांना फोन करून सांगितले होते की, तिच्याबरोबर बलात्कार (Rape) झाला आहे. तसेच तिची तब्येतदेखील खूप खराब झाली आहे. पोलीसांंनी हडसनला त्याक्षणी अटक केली. परंतु सोमवारी त्याला जूनपर्यंतच्या जामिनावर सोडण्यात आले आहे.

लवकरच इंग्लिश प्रीमियर लीगचे (English Premier League) खेळाडू आणि प्रशिक्षकांना जरी सामन्यांपूर्वी सरावासाठी पुरेसा वेळ हवा आहे. परंतु असे असले तरी ब्रिटिशचे सांस्कृतिक मंत्री ऑलिव्हर डोव्हन यांना जूनच्या मध्यापर्यंत फुटबॉल अजिंक्यपद सुरू करण्याची अपेक्षा आहे.

सामाजिक अंतर राखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, प्रीमियर लीगच्या क्लब आठवड्याने सराव करण्यासाठी ‘प्रोटोकॉल’वर सही केली आहे. इंग्लंडमध्ये अव्वल लीगचा शेवटचा सामना ९ मार्चला खेळण्यात आला होता.

ट्रेंडिंग घडामोडी-

-केवळ १ टी२० सामना खेळणारे जगातील ५ प्रसिद्ध क्रिकेटर

-ना विराट, ना रोहित, ना सचिन; फक्त विरुच्या नावावर आहे हा खास विक्रम

-१० भारतीय दिग्गज क्रिकेटपटू व त्यांच्या एक्स गर्लफ्रेंड्स

You might also like