---Advertisement---

‘मला शेवटचं पाहायला या’, कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळण्याआधी मनोज तिवारी काय म्हणाला?

On: शनिवार, फेब्रुवारी 17, 2024 6:43 PM
Manoj Tiwary
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी क्रिकेटपटू मनोज तिवारी सध्या रणजी ट्रॉफी 2024 हंगामात बंगालसाठी खेळत आहे. बंगाल क्रिकेट संघाचा कर्णधार मनोज प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यासाठी तयार आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. शनिवारी (17 फेब्रुवारी) त्याने सोशल मीडिया खात्यावरून आपल्या शेवटच्या रणजी सामन्याची माहिती चाहत्यांना दिली.

मनोज तिवारी (Manoj Tiwary) याने सोशल मीडियावर प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि चाहत्यांसाठी एक भावून संदेश लिहिला. त्याचे होम ग्राऊंड असेलल्या इडेन गार्डन्स स्टेडियमविषयीचे प्रेम या पोस्टमधून पाहायला मिळते. भारतीय क्रिकेट संघाच्या दिग्गजाने चाहत्यांना अशी अपील देखील केली की, त्याच्या शेवटच्या सामन्यासाठी मैदानात येऊन समर्थन करा.

मनोज तिवारीने आपल्या अधिकृत एक्स खात्यावरून कारकिर्दीतील शेवटच्या रणजी सामन्याची माहिती दिली. हा सामना बिहारविरुद्ध असून शुक्रवारी (16 फेब्रुवारी) सुरू देखील झाला. पण शेवटच्या दोन दिवसांमध्ये चाहते मनोज तिवारीला अलविदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मैदानात येऊ शकतात. माजी भारतीय क्रिकेटपटूने पोस्टमध्ये लिहिले की, “सर्वांना नमस्कार. शेवटचा डाव खेळण्याची वेळ आली आहे. 22 यार्डच्या खेळपट्टीवर ही माझी शेवटची वेल असेल. याचा एक-एक गोष्ट माझ्या लक्षात राहील. कारकिर्दीतील एवढे वर्ष तुम्हा मला प्रोत्साहित आणि प्रेम करत राहिला, त्यासाठी धन्यवाद. जर तुम्ही सर्वजन उद्या आणि परवा माझे होम ग्राऊंड ईडन गार्डन्सवर मला पाठबळ धेण्यासाठी आला तर खूप छान वाटेल. क्रिकेटचा एक प्रामानिक सेवक, मनोज तिवारी.”

मनोजच्या क्रिकेट कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर त्याने भारतासाठी 2008 साली पदार्पण केले. भारतीय क्रिकेट संघाकडून त्याला एकूण 12 वनडे आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 286, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मनोजने 147 सामन्यांमध्ये 47.94च्या सरासरीने 10165 धावा केल्या आहेत. पण त्याच्या नेतृत्वात बंगाल संघ कधी रणजी चॅम्पियन झाला नाही, ही एकमेव खंत माजी भारतीय क्रिकेटपटूच्या मनात राहू शकते. (‘Come see me for the last time’, what did Manoj Tiwary say before playing the last Ranji match of his career?)

महत्वाच्या बातम्या – 
राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही भारत ड्रायविंग सीटवर! जयस्वाल-गिलमुळे भारताकडे 322 धावांचे लीड
यशस्वी जयस्वालची नाद खेळी! मागच्या सामन्यातील द्विशतकानंतर शनिवारी सलामीवीराचे वादळी शतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---