त्या खेळामध्ये केवळ तो खेळाडूच नाहीतर त्याच्या चाहत्यांच्याही भावना असतात. एक चाहता म्हणून काहीजण त्या खेळाला आणि त्या खेळाडूच्या कामगिरीला जवळून फॉलो करत असतात. यामुळे त्यांच्यासाठी तो एक विजय आणि पराभव कायम लक्षात राहतात. काहींचे पुनरागमनही तसेच भन्नाट ठरते. यावर्षीही क्रिकेटमध्ये अशाच काही स्टार खेळाडू आणि संघांनी जबरदस्त पुनरागमन केले आहे. चला तर मग पाहुया, त्यांची कामगिरी.
1. पदार्पणातच संघाला आयपीएलचे विजेतेपद जिंकून देणारा ते भारताचा कर्णधार असा राहिला प्रवास
2022 वर्ष सुरू झाले आणि अनेकांनी भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पुनरागमन करणार असे भवितव्य वर्चवले. 2021मध्ये पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या हार्दिककडे थोडेफार दुर्लक्ष होऊ लागले आणि वेंकटेश अय्यर त्याची जागा घेणार असे म्हटले जाऊ लागले. अय्यरने 2021च्या आयपीएलमध्ये 10 सामन्यात 370 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 अर्धशतकी खेळी करताना 3 विकेट्स घेतल्या. त्याने 2021चा टी20 विश्वचषक झाल्यानंतर संघात पदार्पण केले. यामुळे तो हार्दिकची जागा घेणार अशी चर्चा सुरू झाली.
आयपीएल 2022मध्ये असे काही घडले जे सर्वासाठीच आश्चर्याचे होते. त्या हंगामात भारताला टी20चा कर्णधार मिळाला. हार्दिकने त्या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना संघाला पदार्पणातच विजेतेपद मिळवून दिले. यामध्ये त्याच्या फलंदाजीबरोबरच गोलंदातही सुधारणा केली आणि संघासाठी महत्वाच्या विकेट्स घेतल्या. या स्पर्धेतील त्याचे नेतृत्व पाहुन त्याला घरच्या मैदानावर रिषभ पंतच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 सामन्यात भारताचे कर्णधारपद भुषवण्याची जबाबदारी मिळाली. त्यानंतर त्याने आयर्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि आता श्रीलंकेविरुद्ध तो नेतृत्व करणार आहे.
यावर्षी त्याने 27 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 33.72च्या सरासरीने 607 धावा करताना 20 विकेट्सही घेतल्या. त्याचबरोबर तो 3 वनडे सामन्यात 100 धावा करताना 6 विकेट्सही घेतल्या. यावरून एकप्रकारे त्याने भारतीय संघात जबरदस्त पुनरागमन केले.
2. विराट कोहलीने शतकाचा 1000 दिवसांचा दुष्काळ संपवला
जेव्हापासून कोरोनोनंतर क्रिकेट सुरू झाले तेव्हापासून विराट कोहली याच्यासाठी मात्र पहिल्यासारखे काही घडले नाही. 2020 आणि 2021 या दोन्ही वर्षात विराटचे 71वे शतक पाहायला मिळालेच नाही. असे असले तरी तो अर्धशतकी खेळी करत सरासरीमध्ये घसरण होऊ देत नव्हता. मग झाला 2022चा प्रवेश आणि त्याचा प्रवास आणखी खडतर झाला. तो अर्धशतकी खेळी करण्यासही प्रयत्न करू लागला. यामुळे अर्धे वर्ष संपत आले तरी त्याची ते अप्रतिक्षीत शतक आले नाही.
या दरम्यान विराटने मीडियाशी बोलताना तो कोणत्या मानसिक स्थितीतून जात आहे हे स्पष्ट केले. काही काळाच्या ब्रेकनंतर तो परतला मात्र तरीही हवी तशी कामगिरी करताना तो अडखळताना दिसला. त्याने हार न मानता त्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आणि आशिया चषकात चाहत्यांना जुना विराट पाहायला मिळाला.
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आशिया चषक खेळला गेला. तो जरी श्रीलंकेने जिकंला असला तरी त्या स्पर्धेत विराटने विशेष खेळी करत चर्चेला हवा दिली. त्याने या स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध 61 चेडूत नाबाद 122 धावांची खेळी केली. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी20 मधील पहिले आणि एकूण कारकिर्दीतील 71वे शतक ठरले. या स्पर्धेनंतरही त्याची गाडी काही थांबली नाही.
विराटने टी20 विश्वचषक 2022च्या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध नाबाद 82 धावांची खेळी केली. त्या सामन्यात भारत 4 विकेट्स गमावत 31 धावसंख्येवर होता आणि भारताला 160 धावसंख्येच लक्ष्य मिळाले होते. त्याने अशीच कामगिरी सुरू ठेवली मात्र संघाला उपांत्य फेरी पराभवाचा सामना करावा लागला.
यावर्षी विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1348 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतक आणि 11 शतकांचा समावेश आहे. टी20ची कामगिरी पाहिली तर त्याने 55.78च्या सरासरीने 781 धावा केल्या आहेत.
4. इंग्लंडचे बझबॉल आणि कसोटी क्रिकेटला नवे वळण-
यंदाचे वर्ष कसोटी क्रिकेटसाठी कमालीचे ठरले. दिर्घ काळाच्या या प्रकाराचे चाहते काही कमीच लोक असतात, कारण सध्या टी20 लीग क्रिकेट वाढत चालल्या आहेत. जवळपास 4 तासांत संपणारा हा सामना लोकांच्या लवकरच आवडीचा झाला, मात्र पाच दिवस चालणाऱ्या कसोटीकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झाले नाही. त्याला कारणीभूत ठरले इंग्लंड पुरूष क्रिकेट संघ. बेन स्टोक्स कर्णधार आणि ब्रेंडन मॅक्युलम मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या इंग्लंड संघाने त्यांच्या घरच्या आणि बाहेरच्या मैदानावर सदाबहार खेळ करत अनेक कसोटी सामने जिंकण्याची कामगिरी 2022मध्ये केली. मात्र त्यांच्यासाठी या वर्षाची सुरूवात निराशाजनक झाली होती.
इंग्लंडने वेस्ट इंडिज दौऱ्यात कसोटी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍशेस मालिका 4-0 अशी गमावली. त्यावेळी जो रुट याच्या नेतृत्वाखाली संघ 17 पैकी केवळ एकच सामना जिंकला. मग जूनमध्ये सत्तापालट झाली. स्टोक्स-मॅक्युलम जोडीने संघाच्या खेळात बदल केला. नेहमीप्रमाणे टीकून खेळणारा इंग्लंड पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळण्यास सुरूवात करू लागला. मग गोलंदाजी असो वा फलंदाजी. रुट आणि बेयस्टो यांनी तर शतकांची रांग लावत मोठ्या धावसंख्या उभारण्याचे काम केले. अशात अनेकांनी संघात पुनरागमन आणि पदार्पण केले. बेन डकेट याने तर सहा वर्षानंतर संघात पुमरागमन करताना पाकिस्तान दौऱ्यातील कसोटी मालिका गाजवली. इंग्लंडचा बेधडक पवित्रा पाहता त्यांनी पुढील 10 पैकी 9 कसोटी सामने जिंकले. या वर्षाच्या शेवटीही त्यांनी पाकिस्तानला त्यांच्यात घरात तिन्ही कसोटी सामन्यात पराभूत केले.
इंग्लंडचा हा खेळ पाहता पुढील आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीप जो संघ खेळेल त्याच्यासाठी इंग्लंडविरुद्ध जिंकणे कठीण आहे.
3. आशिचा चषकाचा चॅम्पियन श्रीलंका
जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा पाकिस्तान जिंकणार, भारत जिंकणार आणि त्यांना बांगलादेश चांगली टक्कर देणार, अशा चर्चांना उधान आले होते. कारण भारताची फलंदाजी रोहित शर्मा, विराट आणि रविंद्र जडेजा यांच्यामुळे पुनरागमनामुळे बहरली होती, तर पाकिस्तानकडेही बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि गोलंदाजांचा उत्तम ताफा असे असताना या दोन संघात अंतिम सामना होईल अशी शक्यता वर्तवली गेली. यामध्ये बांगलादेशचा इतिहास पाहिला, तर मागील काही स्पर्धांमध्ये त्यांनी मोठ्या संघांना सामना जिंकण्यासाठी कठीण केले होते. अशामध्ये श्रीलंका कुठेच नव्हती.
2022च्या आशिया कपचे यजमानपद श्रीलंकेकडे होते. त्यातच त्यांच्या क्रिकेट, राजकिय आणि आर्थिक स्थितीत होत असणाऱ्या घसरणीमुळे त्यांना ही स्पर्धा जिंकायचीच होती आणि झालेही तसेच. या स्पर्धेतील पहिला सामना गमावत पुढील सगळे सामने जिंकत त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली आणि पाकिस्तानला 23 धावांनी पराभूत करत सहावा आशिया कप उचलला. श्रीलंकेचा हा प्रवास एखाद्या चित्रपटासारखाच होता. दसुन शनाका याच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघाने खरच सगळ्यांना आशिया कप जिंकत आश्चर्याचा धक्का दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाचे-
जेव्हा कोलकात्यात चालली पेलेची जादू, तेव्हा भारताच्या ‘या’ खेळाडूने अडवला होता गोल