---Advertisement---

८ भाषेत होणार आयपीएलचे प्रक्षेपण, पहा मराठीबद्दल काय झाला निर्णय

On: बुधवार, सप्टेंबर 16, 2020 3:51 PM
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएल, त्याच्या १३ व्या हंगामाला आता फक्त ३ दिवस बाकी आहेत. आयपीएलचे तब्बल १२० देशांमध्ये लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. स्टार इंडियाकडे या स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्क आहेत.

भारतात हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त हे स्थानिक भाषांमध्येही हे सामने प्रसारित केले जाणार आहे. यामध्ये तमिळ, तेलगू, कन्नड, बांगला, मल्याळम आणि मराठीचा समावेश असेल.

हॉटस्टारवरही दर्शक सामन्याचे लाईव्ह प्रसारण पाहू शकतात. परंतू, यासाठी वापरकर्त्यास प्रीमियम सदस्यता घेणे आवश्यक असेल. यूके-आयर्लंडमधील स्काई स्पोर्ट्स, यूएस-कॅनडामधील विलो टीव्ही आणि ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील फॉक्स स्पोर्ट्सवरही आयपीएलचे प्रसारण होणार आहे.

तसेच, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील प्रसारणांसाठी ‘स्टार’ स्थानिक प्रसारकांशी चर्चा करीत आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये एकही खेळाडू नसलेल्या पाकिस्तामध्ये या स्पर्धेचे प्रक्षेपण होणार नाही.

आयपीएलच्या १३ व्या हंगामातील पहिला सामना १९ सप्टेंबरला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात रंगणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---