मागील काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाने श्रीलंका संघासोबत मर्यादित षटकांची मालिका खेळली आहे. याचदरम्यान संघाचा एक भाग असलेला फिरकीपटू राहुल चाहरने श्रीलंका संघाविरुद्ध उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. त्याच्या या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्राने देखील त्याचे कौतुक केले आहे. आकाश चोप्राने राहुल चहरची तुलना फिरकीपटू राशिद खान सोबत केली आहे.
श्रीलंका संघाविरुद्ध टी२० मालिकेत भारतीय संघाला १-२ ने हार पत्करावी लागली आहे. असे असले तरी राहुल चाहरने शेवटच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. त्याने या सामन्यात ३ विकेट घेतले, तर मालिकेत ४ विकेट्स घेतल्या. तसेच त्याने एकदिवसीय मालिकेत देखील एकच सामना खेळला होता, ज्यामध्ये त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने श्रीलंका दौऱ्यातील एकूण ३ सामन्यात ७ विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीचे अनेक जणांकडून कौतुक होत आहे.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर आकाश चोप्राने लेग स्पिनर राहुल चाहरचे कौतुक केले आणि म्हटले की, ‘राहुलला भारतीय संघात सतत संधी मिळत नाही. कारण त्याच्या आधी युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे. भारतीय संघाकडे रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या रूपात फिरकीपटूंचे पर्याय उपलब्ध आहेत. वरुण चक्रवती देखील मिस्ट्री स्पिनर म्हणून भारतीय संघात स्थान मिळवत आहे. पण, राहुल चाहरने प्रत्येक संधीचा फायदा घेतला आहे आणि भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली.’
आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, ‘राहुल चाहर पूर्ण आत्मविश्वासाने गोलंदाजी करतो. तो हवेत गतीने गोलंदाजी करतो, त्याचा चेंडू खेळपट्टीवर पडून फलंदाजाला चूकवून निघून जातो. त्याची गोलंदाजी करण्याच्या स्टाईलवरून असे वाटते की, तो गुगली टाकेल पण खरंतर तो लेग स्पिन चेंडू टाकतो. त्याच्याकडे गूढ गोलंदाजीचे पर्याय आणि गोलंदाजी करण्याचे मिश्र पर्याय देखील आहेत. त्याचबरोबर राहुल मला रशीद खानची आठवण करून देतो. जर त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली, तर भारतीय संघाला युझवेंद्र चहल सोबत टी२० विश्वचषकात त्याची देखील निवड करावी लागेल.’
दुसऱ्या आणि तिसऱ्या टी२० मध्ये युजवेंद्र चहलच्या जागी राहुल चहरला संधी मिळाली होती. या संधीचे सोने करत त्याने आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी केली. युझवेंद्र चहल या टी२० मालिकेदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या कृणाल पंड्याच्या संपर्कात आला होता, त्यामुळे त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. तसेच नंतर चहलचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे, तो सध्या श्रीलंकेत क्वारंटाईन आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“भारताच्या विकेट पडत होत्या, माझी मुले मला शिव्या देत होती” टी२० मालिकेतील पराभवावर भडकला सेहवाग
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ‘हा’ संघ होणार विजयी, इंग्लंडच्या दिग्गजाचे मोठे भाकीत
भारतीय संघातील ‘या’ ३ दिग्गज खेळाडूंसाठी इंग्लंड दौरा ठरु शकतो अखेरचा