---Advertisement---

रोहितच्या ‘या’ निर्णयावर संतापले रवी शास्त्री; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘बरोबर बोललात गुरुजी’

On: गुरूवार, जून 8, 2023 6:32 PM
Ravi-Shastri
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पहिल्या दिवशी दबावात दिसला. ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत फक्त 3 विकेट्स गमावल्या आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत 327 धावा केल्या होत्या. भारताच्या बचावात्मक खेळावर भारतीय माजी प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री नाराज झाले. त्यांनी म्हटले की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत सकारात्मक मानसिकता दाखवली नाही.

भारतीय संघाने अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान दिले नाही. या सामन्यात भारताने चार वेगवान गोलंदाजांसोबत उतरण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीवर गवत असल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण भारताचा हा निर्णय योग्य ठरला नाही. ऑस्ट्रेलियाने ट्रेविस हेड (नाबाद 146) आणि स्टीव्ह स्मिथ (नाबाद 95) यांच्यातील चौथ्या विकेटसाठी नाबाद 251 धावांच्या भागीदारीच्या मदतीने 3 विकेट्स गमावत 327 धावांचा डोंगर उभारला.

काय म्हणाले शास्त्री?
शास्त्रींनी पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आयसीसीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, “पहिल्या दिवशी जे काही झाले, ते नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या मानसिकतेशी जोडले आहे. त्यामुळे तुम्ही चार वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूसोबत मैदानात उतरला.”

ते म्हणाले की, “जर मानसिकता सकारात्मक असती, तर तुम्ही प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असता. पहिले सत्र सांभाळून खेळले असता आणि नंतर पाहिले असते की, तुम्ही दिवसात 250 धावांपर्यंत पोहोचू शकता का, मोठ्या धावसंख्येबाबत विचार केला नसता. तसेच, परिस्थिती असती आणि पहिले सत्र चांगले गेले असते, तर तुम्ही यापेक्षाही मोठी धावसंख्या उभारू शकला असता.”

दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने गमावल्या विकेट्स
भारतीय संघाचे गोलंदाज पहिल्या दिवशी विकेट्ससाठी संघर्ष करत होते. मात्र, दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारताने ऑस्ट्रेलियाच्या चार विकेट्स काढल्या. त्यात ट्रेविस हेड (163), स्टीव्ह स्मिथ (121), कॅमरून ग्रीन (6) आणि मिचेल स्टार्क (5) यांचा समावेश होता. लंच ब्रेकनंतर रवींद्र जडेजा याने ऍलेक्स कॅरे याला पायचीत बाद करून ऑस्ट्रेलियाची आठवी विकेट घेतली. (commentator ravi shastri slams rohit sharma for defensive mindset in wtc final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final: स्टीव स्मिथचा जलवा कायम; एक नाही दोन नाही तर तब्बल एवढे रेकॉर्ड काढले मोडीत
धक्कादायक! पहिल्या दिवशी विकेटसाठी तरसणाऱ्या गोलंदाजांवर भडकला रोहित, लाईव्ह सामन्यात दिली शिवी, Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---