---Advertisement---

रवी शास्त्रींनी दिले मेयर्सला नवीन‌ नाव! खास मुंबई स्टाईलच्या नावाची सर्वत्र चर्चा

On: गुरूवार, एप्रिल 20, 2023 4:51 PM
---Advertisement---

राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएल 2023 स्पर्धेच्या 26 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने , पराभूत केले. लखनऊच्या विजयात सलामीवीर कायले मेयर्स याच्यासह अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस आणि वेगवान गोलंदाज आवेश खान यांनी मोलाचा वाटा उचलला. या सामन्यातील एकमेव अर्धशतक झळकावणारा फलंदाज मेयर्स होता. त्याच्या स्पर्धेतील आतापर्यंतच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक करत रवी शास्त्री यांनी त्याला एक विशेष नाव दिले.

गोलंदाजांना मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर लखनऊसाठी कर्णधार केएल राहुल व कायले मेयर्स यांनी संयमी भागीदारी केली. राहुल बाद झाल्यानंतरही मेयर्सने आक्रमण कायम ठेवले. त्याने 42 चेंडूत 51 धावांची खेळी केली. यात 4 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता.

तो फलंदाजी करत असताना समालोचन करत असलेल्या रवी शास्त्री यांनी त्याच्या आक्रमक व वेगवान फटक्यांना पाहून काही शब्द उच्चारले. त्यांनी त्याला तोडू बॅटर म्हटले. तसेच हा फलंदाज चेंडूचा भुसा काढून टाकेल असा आहे असे देखील कौतुक करताना बोलले.

मेयर्स आपला पहिलाच हंगाम खेळताना लखनऊ संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहापैकी तीन सामन्यात त्याला अर्धशतक झळकावण्यात यश आलेय. मेयर्स याच्या फॉर्ममुळे दिग्गज क्विंटन डी कॉक त्याला बाकावर बसून राहावे लागत आहे.

जयपूर येथे खेळण्यात आलेल्या 26 व्या सामन्यात राजस्थान संघाला 10 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 154 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 20 षटकात 6 विकेट्स गमावत 144 धावाच करता आल्या. संथ खेळपट्टीवर राजस्थानच्या आक्रमक फलंदाजांना वेसण घालत लखनऊच्या गोलंदाजांनी संघाला 10 धावांनी विजय मिळवून दिला.

(Commenter Ravi Shastri Said Kyle Mayers Is Todu Player)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

आयपीएलमधील अंडररेटेड आणि सर्वोत्तम खेळाडू कोण? विराटने घेतली दिग्गजांची नावे
राजस्थानला पराभूत केल्यानंतर राहुलचे खळबळजनक भाष्य; म्हणाला, ‘मी कर्णधार म्हणून काहीतरी चुकीचं…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---