इंग्लंडच्या बर्मिंघम शहरात सध्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धा खेळली जात आहे. स्पर्धेचा पहिला दिवस भारतासाठी चांगला राहिला आहे. टेबल टेनिस आणि स्विमिंगमध्ये भारताला विजय मिळाला आहे. परंतु क्रिकेट संघाला मात्र पराभव स्वीकारावा लागला. एकंदरीत विचार केला तर, भारताच्या एकूण १६ खेळाडूंनी कॉमनवेल्थ गेम्सच्या उपांत्यपूर्व फेरीत जागा पक्की केली आहे.
टेबल टेनिस –
कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्याच दिवशी भारताने टेबल टेनिसमध्ये दक्षिण आफ्रिकेला ३-० अशी मात दिली. महिला दुहेरीत भारताची श्रीजा अकुला आणि रीथ टेनिसन या जोडीने लैला एडवर्ड्स आणि दनिशा जयावंत या जोडीला मात दिली.
भारताची टेनिसपटू मनिका बत्रा (Manika Batra) कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्याच एकेरी सामन्यात कमाल प्रदर्शन करत विजय मिळवला. या सामन्यात तिच्या समोर मुशफिकुल कलामचे आव्हान होते. पहिल्या सेटमध्ये तिने ११-५ अशी आघाडी घेतली, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ११-३ आणि तिसऱ्या सामन्यात ११-२ असा अंतराने विरोधी खेळाडूला मागे टाकले. परिणामी तिने मोठ्या अंतराने विजय मिळवला.
बॉक्सिंग –
भारतीय स्टार बॉक्सर शिव थापा याने पाकिस्तानच्या सुलेमान बलोच याला ६३.५ किलो वजनी गटात पराभूत केले आणि प्री क्वार्टर फायनल सामन्यात स्थान मिळवले आहे. सामना एकतर्फी झाला असून भारताने ५-० अशा अंतराने विजय मिळवला. शिवपुढे पाकिस्तानचा सुलेमान खूपच कमजोर पडल्याचे पाहायला मिळाले.
क्रिकेट –
कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games 2022) यावर्षी पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश केला गेला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताला ३ विकेट्सने पराभव मिळला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ विकेट्सच्या नुकसानावर १५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने १९ षटकांमध्ये तीन विकेट्स राखून विजय मिळवला.
हॉकी –
भारतीय हॉकी संघानेही कॉमनवेल्थ गेम्सच्या अभियानाची सुरवात शुक्रवारीच केली होती. पूल एकच्या या सामन्यात भारताने घाना संघाविरुद्ध ५-० असा मोठा विजय मिळवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी करणार ‘ही’ खास तयारी! खुद्द विंडीजच्या कर्णधारानेच सांगितलंय
‘ती असती तर आम्ही…’, पहिल्या टी२० पराभवानंतर रेणूका सिंगने व्यक्त केलं दु:ख
टीम इंडियाचा ‘हा’ स्टार खेळाडू मैदानात उतरण्यासाठी सज्ज, अमित मिश्राने शेअर केली आनंदवार्ता!